जाहीरसभांसाठी इदगाह मैदान; पवननगर येथे जागेचे बुकिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 01:40 AM2019-10-12T01:40:27+5:302019-10-12T01:41:36+5:30
प्रचाराच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली असून, नेत्यांच्या दौरे सुरू झाले आहेत. त्यामुळे जाहीर सभांसाठी मैदानेदेखील बुक होण्यास प्रारंभ करण्यास प्रारंभ झाला आहे. त्यानुसार गोल्फ क्लब आणि पवननगर येथे तीन जणांनी सभेसाठी अर्ज दाखल केले आहेत. अर्थात, त्यासाठी अधिकृतरीत्या शुल्क भरलेले नाही.
नाशिक : प्रचाराच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली असून, नेत्यांच्या दौरे सुरू झाले आहेत. त्यामुळे जाहीर सभांसाठी मैदानेदेखील बुक होण्यास प्रारंभ करण्यास प्रारंभ झाला आहे. त्यानुसार गोल्फ क्लब आणि पवननगर येथे तीन जणांनी सभेसाठी अर्ज दाखल केले आहेत. अर्थात, त्यासाठी अधिकृतरीत्या शुल्क भरलेले नाही.
विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृत प्रचार करण्यासाठी यंदा कमी दिवस मिळालेत अवघ्या पंधरा दिवसांत संपूर्ण मतदारसंघात प्रचार करण्यासाठी उमेदवारांना जिवाचे रान करावे लागत आहे. त्यात नेत्यांच्या तारखा मिळवणे आणि त्यांच्या प्रभाव क्षेत्रात सभा घेणे यासाठीदेखील नियोजन करावे लागत आहे. जाहीर सभांसाठी नेत्यांच्या तारखा मिळू लागल्याने आता मैदाने बुक करण्यास प्रारंभ झाला आहे. येत्या मंगळवारसाठी (दि.१५) भारिप बहुजन महासंघाने नोंदणी केली आहे. तर १७ आॅक्टोबरसाठी राष्टÑवादीने आणि १८ आॅक्टोबर रोजी एका अपक्ष उमेदवाराने पवननगर येथील मैदान बुक केले आहेत. अर्थात, केवळ नोंदणी करण्यात आली असून, प्रत्यक्षात मैदानाचे भाडे भरलेले नाही. महापालिकेने गोल्फ क्लब (इदगाह मैदान)साठी ६९ हजार ७३ रुपये आणि पवननगर येथील मैदानाचे भाडे नऊ हजार ५०६ रुपये इतके निश्चित केले असून, नोंदणीनुसार शुल्क जमा झालेच तर महापालिकेला ९० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळणार आहे.