रस्त्यांच्या समस्यांवर भावी वास्तुविशारदांच्या ‘आयडिया’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:23 AM2017-09-29T00:23:58+5:302017-09-29T00:24:18+5:30
‘स्मार्ट सिटी’चे वेध लागलेल्या नाशिकमधील विविध चौक व रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित व्हावी, यासाठी रस्त्यांच्या समस्यांवर भावी वास्तुविशारदांनी ‘आयडिया’ सांगितल्या.
नाशिक : ‘स्मार्ट सिटी’चे वेध लागलेल्या नाशिकमधील विविध चौक व रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित व्हावी, यासाठी रस्त्यांच्या समस्यांवर भावी वास्तुविशारदांनी ‘आयडिया’ सांगितल्या.
निमित्त होते, आयडिया महाविद्यालयाच्या वतीने गंगापूरोड वरील कुसुमाग्रज स्मारकात पार पडलेल्या चार दिवसीय ‘व्हर्टिकल स्टुडिओ’ या डिझाइन कार्यशाळेचे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत रस्त्यांच्या रचनेच्या माध्यमातून शहराच्या सौंदर्यामध्ये भर कशी टाकता येईल, याचाही विचार स्वतंत्ररीत्या क रत त्याचे सादरीकरण सभागृहात सादर केले. वाहतूक कोंडी, अवैधरीत्या बेशिस्तपणे उभी केलेली वाहने, अतिक्रमण, अयोग्य वाहतूक बेट त्यामुळे होणारी गैरसोय आदी समस्यांचे ग्रहण शहरातील रस्त्यांना लागले आहे. कॉलेजरोड, एमजीरोड, सराफ बाजार, मेनरोड, दहीपूल नाशिकरोडचा उड्डाणपुलासह अहल्यादेवी होळकर पूल, शहीद पूल आदिंचा अभ्यास यावेळी कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी केला. येथील समस्या कशा पद्धतीने सोडविता येतील आणि वाहतुकीला शिस्त कशी लावता येईल, या दृष्टिकोनातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे संचालक विजय सोहनी, अधिष्ठाता विवेक पाटणकर यांचे मार्गदर्शन लाभले.