आडगावला ग्रामदेवतेची मूर्ती चोरीस

By admin | Published: November 23, 2015 12:07 AM2015-11-23T00:07:23+5:302015-11-23T00:07:43+5:30

आज ग्रामसभा : चौदा किलो पितळाची महालक्ष्मी मूर्ती

The idol of the goddess gramdevati in the Adgaon stolen | आडगावला ग्रामदेवतेची मूर्ती चोरीस

आडगावला ग्रामदेवतेची मूर्ती चोरीस

Next

पंचवटी : आडगाव येथील महालक्ष्मी चौकामध्ये असलेल्या महालक्ष्मी देवी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी थेट देवीची पितळाची मूर्तीच चोरून नेल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गावकऱ्यांच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे. देवी मूर्तीच्या चोरीप्रकरणी आज सोमवारी (दि. २३) सकाळी ग्रामसभा बोलाविण्यात आली आहे.
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास आडगावमधील ग्रामदेवता असलेल्या महालक्ष्मी देवीच्या मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी देवीची मूर्तीच चोरून नेल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मंदिरात चौदा किलो वजनाची सुमारे २५ हजार रुपये किमतीची पितळी धातूची मूर्ती होती, अशी माहिती पोलीस पाटील एकनाथ मते यांनी दिली आहे. सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे भाविक दर्शनासाठी मंदिरात गेले असता गाभाऱ्यात मूर्तीच नसल्याचे निदर्शनास आले. देवीची मूर्ती चोरीस गेल्याची बातमी गावामध्ये वाऱ्यासारखी पसरताच गावकरी मोठ्या संख्येने मंदिराच्या आवारात जमा झाले. घटनेची माहिती आडगाव पोलीस ठाण्याला मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचारीही मंदिरात पोहोचले. यावेळी मंदिराची पाहणी करून तत्काळ परिसरात तपासचक्रे पोलिसांकडून फिरविण्यात आली. यावेळी जमलेल्या जमावाने पोलीस प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करत मंदिरांमध्ये जर देवी-देवतांच्या मूर्ती सुरक्षित नसतील, तर नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करणेच गैर आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)

Web Title: The idol of the goddess gramdevati in the Adgaon stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.