प्रशासनाने कामे केल्यास समस्या मार्गी लागतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:15 AM2020-12-31T04:15:25+5:302020-12-31T04:15:25+5:30

सातपूर गावातील मुख्य रस्त्याच्या मध्यभागी गेल्या अनेक वर्षांपासून भाजीविक्रेत्यांकडून अतिक्रमण केले जात होते. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ...

If the administration does the work, the problems will be solved | प्रशासनाने कामे केल्यास समस्या मार्गी लागतील

प्रशासनाने कामे केल्यास समस्या मार्गी लागतील

Next

सातपूर गावातील मुख्य रस्त्याच्या मध्यभागी गेल्या अनेक वर्षांपासून भाजीविक्रेत्यांकडून अतिक्रमण केले जात होते. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघत नव्हता. विभागीय अधिकारी म्हणून नितीन नेर यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन हा प्रश्न निकाली काढल्याने, ग्रामस्थांच्या वतीने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाग सभापती रवींद्र धिवरे, नगरसेवक दिनकर पाटील, सलीम शेख, सीमा निगळ, दीक्षा लोंढे, इंदुबाई नागरे, विजय भंदुरे, तसेच शंकर पाटील, राजाराम निगळ, रामनाथ मुंदडा, गोकुळ निगळ आदी उपस्थित होते. सातपूर ग्रामस्थांच्या वतीने विभागीय अधिकारी नितीन नेर, ऑनलाइन तक्रार प्रमुख तानाजी निगळ, कोठुळे, रवी पाटील, शाम वाईकर, संजय कोठुळे, माधुरी तांबे, नितीन राजपूत आदी अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश निगळ, नीतीन निगळ, गणेश मौले, नीलेश भंदुरे, चंद्रकिशोर मुंदडा, जगन्नाथ निगळ, शिवाजी मटाले, मोहन बंदावणे, किशोर भट्टड, पवन जैन आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन बाळासाहेब बंदावणे यांनी केले. किसन शेवकर यांनी आभार मानले.

(फोटो ३० सातपूर) विभागीय अधिकारी नितीन नेर यांचा नागरी सत्कार करताना नगरसेवक दिनकर पाटील समवेत रवींद्र धिवरे, सीमा निगळ, राजाराम निगळ, विजय भंदुरे, शंकर पाटील, तानाजी निगळ, शाम वाईकर, नितीन राजपूत, रवी पाटील, माधुरी तांबे आदी.

Attachments area

Web Title: If the administration does the work, the problems will be solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.