ग्रामपंचायत बिनविरोध केल्यास मिळणार २५ ते ५० लाख निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:12 AM2020-12-29T04:12:31+5:302020-12-29T04:12:31+5:30

दिंडोरी : तालुक्यातील एकूण ६० ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या १५ जानेवारीला होत आहे. ज्या ग्रामपंचायतींची निवडणूक ग्रामस्थांनी एकत्र येत, बिनविरोध ...

If Gram Panchayat is formed without any objection, it will get 25 to 50 lakh funds | ग्रामपंचायत बिनविरोध केल्यास मिळणार २५ ते ५० लाख निधी

ग्रामपंचायत बिनविरोध केल्यास मिळणार २५ ते ५० लाख निधी

Next

दिंडोरी : तालुक्यातील एकूण ६० ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या १५ जानेवारीला होत आहे. ज्या ग्रामपंचायतींची निवडणूक ग्रामस्थांनी एकत्र येत, बिनविरोध केल्यास एका महिन्याच्या आत गावाच्या विकासासाठी आमदार निधीतून पाच हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या गावाला २५ लाख व ५ हजाराच्या पुढे लोकसंख्या असलेल्या गावाला ५० लाख रुपयांचा विकास निधी गाव मागेल, त्या कामासाठी देण्यात येईल, अशी माहिती विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ यांनी दिली. तालुक्याचा विकास करण्यासाठी स्थानिक पातळीवर गावात एकोपा असावा व गाव पातळीवर ग्रामस्थांनी पक्षभेद विसरून, गट तट विसरून एकत्र आल्यास गावाचा विकास करण्यास मदत होईल. दिंडोरी तालुक्यात येत्या १५ जानेवारीला एकूण ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. ४ जानेवारीला माघारी असून, तत्पूर्वी ज्या ग्रामपंचायतच्या निवडणुका आहेत, तेथील ग्रामस्थांनी एकत्र येत सर्व जागा बिनविरोध कराव्यात. ज्या ग्रामपंचयातच्या सर्व जागा बिनविरोध होतील, त्या गावाला एक महिन्याच्या आत २५ लाख व पाच हजार लोकसंख्येच्या पुढे असलेल्या गावाला ५० लाख रुपयांचा विकास निधी देण्यात येईल, असे झिरवाळ यांनी सांगितले.

Web Title: If Gram Panchayat is formed without any objection, it will get 25 to 50 lakh funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.