किराणा बाजार सुस्तावला तर भाजीपाला बाजारात तेजीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:11 AM2021-06-28T04:11:41+5:302021-06-28T04:11:41+5:30
चौकट- कोथिंबीर ६७ रुपये जुडी सध्या बाजार समितीत गावठी कोथिंबीर चांगला भाव घेऊ लागली असून सरासरी २५ पासून ६२ ...
चौकट-
कोथिंबीर ६७ रुपये जुडी
सध्या बाजार समितीत गावठी कोथिंबीर चांगला भाव घेऊ लागली असून सरासरी २५ पासून ६२ रुपये जुडीचा दर आहे. दोन दिवसांपूर्वी साईधन या व्हेजिटेबल कंपनीत शाम बोडके, पराडे, लासुरे या व्यापाऱ्यांनी ६७ रुपये जुडीने कोथिंबिरीची खरेदी केली.
चौकट-
मसाल्याचे पदार्थ तेजीत
किराणा बाजारात डाळी, खाद्य तेल यांचे दर उतरले असले तरी मसाल्याच्या पदार्थांमध्ये मात्र तेजी आहे. बाजारात सध्या मंदीचे वातावरण असून ग्राहकीवरही परिणाम झाला आहे.
चौकट-
१,७८८ क्विंटल फळांची आवक
बाजार समितीत सर्व फळांची एकूण आवक १,७८८ क्विंटल इतकी होती. सफरचंद रोज येत नाही. तर अंब्याची आवक टिकून आहे. आरक्ता डाळिंबाला ५० ते ६० रुपये किलोचा दर मिळत आहे. तर केळी ८. ५० पासून १५ रूपये किलोपर्यंत विकली जात आहे.
कोट-
किराणा बाजारात बहुतेक वस्तूंचा उठाव कमी झाला आहे. यामुळे बाजारातील वातावरण काहीसे सुस्तावलेले आहे. मंदीच्या सावटामुळे ग्राहकांना दर आणखी उतरण्याची अपेक्षा असते. त्यामुळे आजची खरेदी उद्यावर ढकलली जाते. - अनिल बूब, किराणा व्यापारी
कोट-
भाजीपाल्याच्या मिळणाऱ्या दरातून किमान उत्पादन खर्च निघत असून खर्चाची तोंडमिळवणी होत असते. औषधांच्या वाढत्या किमती, मजुरीचे दर पाहता भाजीपाला उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती खूप काही मिळते असे नाही. - ज्ञानेश्वर खाडे, शेतकरी
कोट -
डाळी, तेल उतरले असले तरी मसाल्याचे पदार्थ वाढले आहेत. मोठे कुटुंब असलेल्या घरांमध्ये भाजीपाला घेणे परवडण्यासारखे नाही. त्यात पेट्रोलमध्ये झालेली दरवाढ यामुळे सर्वसामान्यांना खूप काही मोठा दिलासा मिळाला आहे असे नाही. - अंजली पवार, गृहिणी