रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होण्यास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:46 AM2018-08-13T00:46:38+5:302018-08-13T00:46:59+5:30
आपल्या देशात कर्करोगाचे रुग्ण हे अन्य देशांपेक्षा वेगळे आहेत. भारतात अमेरिकेपेक्षा वेगळ्या कारणांनी कर्करोगग्रस्त झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. तिकडे तंबाखू अथवा गुटखा खाल्ला जात नाही. त्याचप्रमाणे भारतात कर्करोगाचे निदान चौथ्या टप्प्यात होणारे निदानाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रु ग्ण दगावण्याची संख्या मोठी आहे. त्यामुळे अमेरिकन पद्धतीने भारतात कर्करोग उपचार करणे किती योग्य आणि त्यात काय बदल करणे अपेक्षित आहे यावर गहन आणि सकारात्मक चर्चा झाल्याचे डॉ. चंद्रशेखर पेठे यांनी सांगितले.
सिडको : आपल्या देशात कर्करोगाचे रुग्ण हे अन्य देशांपेक्षा वेगळे आहेत. भारतात अमेरिकेपेक्षा वेगळ्या कारणांनी कर्करोगग्रस्त झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. तिकडे तंबाखू अथवा गुटखा खाल्ला जात नाही. त्याचप्रमाणे भारतात कर्करोगाचे निदान चौथ्या टप्प्यात होणारे निदानाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रु ग्ण दगावण्याची संख्या मोठी आहे. त्यामुळे अमेरिकन पद्धतीने भारतात कर्करोग उपचार करणे किती योग्य आणि त्यात काय बदल करणे अपेक्षित आहे यावर गहन आणि सकारात्मक चर्चा झाल्याचे डॉ. चंद्रशेखर पेठे यांनी सांगितले.
नाशिक शहरात हॉटेल गेट वे येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय चौथ्या राज्यस्तरीय अँमो परिषदेच्या समारोपप्रसंगी आभार व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी डॉ. शैलेश बोंदार्डे, डॉ. पूर्वेश
पारीख, डॉ. गोविंद बाबू, अँमोचे पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते.
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी डोक्याचा व मानेचा कर्करोग तसेच गर्भाशय आणि अंडाशयाच्या कर्करोगावर चर्चा, परिसंवाद घेण्यात आले. सकारात्मक निकालांची संख्या भारतात कमी आढळते आणि दोष उपलब्ध तंत्रज्ञानाला दिला जातो. या झालेल्या चर्चेत कर्करोग तज्ज्ञांनी कर्करोगाचे निदान लवकर
होण्यासाठी असलेल्या चाचण्यांबाबत जनजागृती आवश्यक असल्याचे सांगितले. नाशिकमध्ये प्रथमच राज्य स्तरावरील कॅन्सर संबंधित तज्ज्ञांच्या परिषदेचे आयोजन केले गेल्याने नाशिक शहर सुयोग्य वातावरणासह महाराष्ट्रातील कॅन्सर उपचारांसाठीचे महत्त्वाचे स्थान निर्माण करणार आहे. या परिषदेचे नाशिकमध्ये आयोजन करून डॉ. बोंदार्डे या कर्करोग तज्ज्ञाने हे महत्त्व अधिकच अधोरेखित केले आहे.