पिस्तूल जमा केले असते तर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:44 AM2019-06-24T00:44:50+5:302019-06-24T00:45:49+5:30
कौटुंबिक वादातून आलेल्या रागाच्या भरात पोलीस नाईक संजय भोये याने आपल्या मुलांवर गोळ्या झाडून ठार मारल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. भोये यांनी ड्यूटी संपल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यातील शस्त्रागारात सर्व्हिस रिव्हॉल्वर जमा केले असते तर कदाचित गोळीबाराची घटना हाणामारीवर निभावली असती, अशी चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.
पंचवटी : कौटुंबिक वादातून आलेल्या रागाच्या भरात पोलीस नाईक संजय भोये याने आपल्या मुलांवर गोळ्या झाडून ठार मारल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. भोये यांनी ड्यूटी संपल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यातील शस्त्रागारात सर्व्हिस रिव्हॉल्वर जमा केले असते तर कदाचित गोळीबाराची घटना हाणामारीवर निभावली असती, अशी चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.
पेठरोडवरील अश्वमेधनगरच्या राजमंदिर सोसायटीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहरच हादरले. त्याला कारणही तसेच होते, पोलीस पिता असलेल्या भोये यांनी कौटुंबिक वादातून दोघा मुलांवर पिस्तूल रोखून चार फैरी झाडल्या होत्या. एकाच्या डोक्यात तर दुसऱ्याच्या छातीत गोळी लागल्याने अतिरक्तस्त्राव होऊन सोनू चिखलकर याचा घटनास्थळी तर शुभमचा रु ग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ैबीटमार्शल म्हणून क र्तव्य बजावणारे भोये यांना पोलीस ठाण्यातून त्यांच्या नावावर पिस्तूलसह ३० जिवंत काडतुसे देण्यात आलेली होती. नियमानुसार ड्यूटी संपल्यावेळी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यातून दिलेले शस्त्र, रायफल असो की रिव्हॉल्व्हर लागलीच शस्त्रागार कक्षात जमा करणे बंधनकारक असते. गुरुवारच्या दिवशी साप्ताहिक सुट्टी असूनही भोये यांनी पिस्तूल व काडतुसे सोबत बाळगली. ड्यूटीवर असताना शस्त्रागार कक्षातून पोलिसांना दिले जाणारे शस्त्र ड्यूटी संपताच पुन्हा जमा करणे बंधनकारक आहे, मात्र पोलीस आयुक्तालयातील काही कर्मचारी शस्त्र शस्त्रागार कक्षात जमा न करता थेट घरी घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडलेल्या या घटनेने समोर आला आहे.
शस्त्रांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर
या घटनेनंतर पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या शस्त्रांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्नही चव्हाट्यावर आला आहे. ड्यूटी संपल्यानंतर अधिकारी, कर्मचाºयांकडून आपली शस्त्रे पोलीस ठाण्यातील शस्त्रागारात नियमितपणे जमा केली जातात का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी याबाबत लक्ष घालून कर्मचाºयांना कर्तव्यावर असताना दिलेले शस्त्र कर्तव्य आटोपल्यानंतर तत्काळ शस्त्रागारामध्ये जमा करण्याबाबत आदेश देणे गरजेचे आहे.