नाटक रद्द झाल्यास भाडे आणि अनामतही जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 01:13 AM2019-07-25T01:13:36+5:302019-07-25T01:14:12+5:30
एखादे नाटक काही कारणामुळे रद्द झाले तर त्याचे भाडे तर रद्दच, परंतु अनामत रक्कमही रद्द होईल, तसेच कोणताही इलेक्ट्रिक एक्स्ट्रा प्लग लावायचा असेल तर ५० रुपये, व्हिडीओ शूटिंग करायचे तरी त्यासाठी पाचशे रुपये आणि प्लग वापरल्याचे पाचशे रुपये... महापालिकेने कालिदास कलामंदिर स्मार्ट केल्यानंतर त्यातील बदलांबरोबरच नियमही बदलले असून, या जाचक नियमावलीमुळे रंगकर्मी आणि नाट्य व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.
नाशिक : एखादे नाटक काही कारणामुळे रद्द झाले तर त्याचे भाडे तर रद्दच, परंतु अनामत रक्कमही रद्द होईल, तसेच कोणताही इलेक्ट्रिक एक्स्ट्रा प्लग लावायचा असेल तर ५० रुपये, व्हिडीओ शूटिंग करायचे तरी त्यासाठी पाचशे रुपये आणि प्लग वापरल्याचे पाचशे रुपये... महापालिकेने कालिदास कलामंदिर स्मार्ट केल्यानंतर त्यातील बदलांबरोबरच नियमही बदलले असून, या जाचक नियमावलीमुळे रंगकर्मी आणि नाट्य व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. बुधवारी (दि.२०) नाट्य व्यावसायिकांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांची भेट घेतली असून त्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करून महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. त्यानंतर ते १५ आॅगस्ट महापालिकेकडे हस्तांतरितदेखील करण्यात आले. परंतु असे करताना भाडे वाढीबरोबच सुधारित नियमावली मंजूर करण्यात आली असून ती अत्यंत जाचक आहे. पूर्वी एखादे नाटक रद्द करावे लागले तर ते कधी कळविले याची नोंद घेऊन भाड्यात कपात केली जात असे आणि त्या नाटकापोटी भरलेली अनामत रक्कम परत मिळत असे,
व्यवस्थापकाविनाच कारभार
महापालिकेने कालिदास कलामंदिराचे भाडे वाढविल्यानंतर त्यातून वसुली मोठ्या प्रमाणात केली जात आहे. परंतु दुसरीकडे पूर्णवेळ व्यवस्थापक महापालिका नेमू शकलेली नाही. त्यामुळे अनेक अडचणी सोडविता येत नाही. पूर्ण वेळ सक्षम व्यवस्थापक नेमल्यास छोट्या छोट्या कामांसाठी आयुक्तांकडे यावे लागणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.