करवाढ रद्द न झाल्यास सभागृहात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:14 AM2018-07-18T01:14:45+5:302018-07-18T01:15:05+5:30
नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेषााधिकाराचा वापर करून केलेल्या दरवाढीच्या विरोधात वज्रमूठ करण्यात विरोधकांना प्राथमिक स्तरावर यश मिळाले असून, करवाढ रद्द करण्यासाठी येत्या गुरुवारी (दि.१९) महासभेत सर्व प्रथम याच विषयावर चर्चा करावी आणि जाचक करवाढ रद्द करावी अन्यथा सभा गुंडाळली तरी सभागृहातच ठिय्या आंदोलन करण्याच्या इशारा दिला आहे. त्यामुळे गुरुवारी होणारी महासभा गाजणार असल्याचे दिसत आहे.
नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेषााधिकाराचा वापर करून केलेल्या दरवाढीच्या विरोधात वज्रमूठ करण्यात विरोधकांना प्राथमिक स्तरावर यश मिळाले असून, करवाढ रद्द करण्यासाठी येत्या गुरुवारी (दि.१९) महासभेत सर्व प्रथम याच विषयावर चर्चा करावी आणि जाचक करवाढ रद्द करावी अन्यथा सभा गुंडाळली तरी सभागृहातच ठिय्या आंदोलन करण्याच्या इशारा दिला आहे. त्यामुळे गुरुवारी होणारी महासभा गाजणार असल्याचे दिसत आहे.
मंगळवारी (दि.१७) यासंदर्भात विरोधी पक्षनेता दालनात दुपारी बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, भाजपाचे गटनेते संभाजी मोरुस्कर, त्याचप्रमाणे विलास शिंदे, शाहू खैरे, गजानन शेलार, गुरुमित बग्गा, सलीम शेख, दीक्षा लोंढे आदी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती थेट रामायण गाठून महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, सभागृह नेते दिनकर पाटील यांना देण्यात आली. या घटनेनंतर भाजपाचे सबुरीचे धोरण घेतले असले तरी मुळातच विरोधकांच्या बैठकीत सभागृह नेते आणि गटनेतेदेखील उपस्थित असल्याने त्यासंदर्भात तूर्तास एकमत झाल्याचे दिसत आहे.
महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्च महिन्यात जमिनींचे सरकारी भाडेमूल्य जाहीर केले. त्याचबरोबर खुल्या भूखंडावरदेखील असलेल्या कराच्या दरात वाढ केली. यासंदर्भात बोलविण्यात आलेल्या विशेष महासभेत विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निर्माण घेता येत नसल्याने आता १९ तारखेला सभा होणार असून, त्यासंदर्भात रणनिती आखण्यासाठी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी ही बैठक बोलविली होती. त्यात ठरल्यानुसार नाशिककरांवर होणारी करवाढ भाजपासह कोणत्याच पक्षाला समर्थनीय नाही. त्यामुळे सत्तारूढ आणि विरोधक, असा विचार न करता नाशिककर म्हणून भूमिका घ्यावी, असे ठरविण्यात आले. विरोधक विरोधाला विरोध करणार नाहीत. सभागृहात सर्व चर्चेअंती करवाढीबाबत निर्णय व्हावा, अशी अपेक्षा आहे. महासभेच्या प्रारंभी कुठल्याही परिस्थितीत करवाढीचाच विषय घेण्यात यावा, त्यावर चर्चा झाल्यानंतरच मग प्रशासनाने बंद केलेल्या १३६ आंगणवाड्यांचा प्रस्ताव चर्चेला घ्यावा, असे ठरविण्यात आले. महापौरांनी या क्रमवारीत बदल केला अथवा महासभा गुंडाळण्याचा प्रयत्न केला तर विरोधक सभागृहातच ठिय्या मांडतील, असा इशारा देण्यात आला.
भाजपाचे तळ्यात मळ्यात?
४विरोधकांच्या बैठकीला सत्तारूढ पक्षाचे सभागृह नेते दिनकर पाटील यांनी हजेरी लावलीच, परंतु त्याचबरोबर गटनेते संभाजी मोरुस्कर पूर्णवेळ हजर होते. मात्र, विरोधीपक्षांनी एकमताने ही भूमिका स्पष्ट केल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी शहराध्यक्ष आणि आमदारांशी चर्चा करावी लागेल वगैरे सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपा महासभेत नक्की काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.
४महापालिकेच्या याच महासभेत काही अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचे तर काही सेवानिवृत्त अधिकाºयांवर कारवाई करण्याचे प्रस्ताव आहेत. त्यातील अनेक अधिकाºयांनी लॉबिंग सुरू केले असून, गटनेत्यांची आणि सत्तारूढ नेत्यांच्या भेटीगाठींना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे सभागृहात करवाढीच्या निमित्त करून अधिकाºयांनी वाचवले जाते की, कारवाईस मान्यता दिली जाते हा सध्या महापालिका वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
पालकमंत्र्याचा आज निर्णय
४करवाढीबाबत महासभेत विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता गृहीत धरून त्याची हवा काढण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन बुधवारी (दि. १७) निर्णय घेण्याची शक्यता आहे. तथापि, त्यांनी काहीही निर्णय दिला तरी महासभेत निर्णय घेऊनच त्याला वैधानिक स्वरूप देता येऊ शकेल.