रक्तदानात समाजघटकांनी सातत्य राखल्यास सदैव ‘सरप्लस’ साठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:11 AM2021-06-28T04:11:33+5:302021-06-28T04:11:33+5:30

नाशिक : रक्तदानाच्या प्रक्रियेत सर्व सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, शासकीय आणि खासगी कार्यालयांनी दरवर्षी पुढाकार घेऊन रक्तदानाची मोहीम ...

If there is continuity in blood donation, there will always be 'surplus' stocks! | रक्तदानात समाजघटकांनी सातत्य राखल्यास सदैव ‘सरप्लस’ साठा !

रक्तदानात समाजघटकांनी सातत्य राखल्यास सदैव ‘सरप्लस’ साठा !

Next

नाशिक : रक्तदानाच्या प्रक्रियेत सर्व सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, शासकीय आणि खासगी कार्यालयांनी दरवर्षी पुढाकार घेऊन रक्तदानाची मोहीम राबविल्यास महाराष्ट्राला कधीही रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही. किंबहुना नियोजनबद्धपणे रक्तदान ड्राइव्ह चालवल्यास सरप्लस रक्तसाठा राहून महाराष्ट्र संपूर्ण देशाला आवश्यकतेनुसार रक्तपुरवठा करू शकेल, असा विश्वास रक्तदान चळवळीला प्रोत्साहन देणारे नाशिकचे प्रथितयश बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि लोकमतचे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्ताने २ जुलैपासून राज्यभरात रक्तदान मोहीम राबविण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेच्या निमित्ताने त्यांनी लोकमतशी मनमोकळा संवाद साधत या मोहिमेत सहभागी करून समाजसेवेची संधी दिल्याबाबत आभारदेखील मानले.

प्र. रक्तदानाच्या चळवळीबाबत आपण सदैव आग्रही भूमिका घेता, त्यामागे काय कारण आहे ?

दीपक चंदे : रक्तदान हे महादान, रक्तदान म्हणजे जीवनदान हे आपणा सर्वांना माहिती आहे. तसेच रक्त हे जगातील कोणत्याही कारखान्यात निर्माण करता येत नाही. त्यामुळे दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी रक्त तर नक्कीच द्यावे. त्याचबरोबर रक्तदात्यालाही रक्तदानामुळे शारीरिकदृष्ट्या खूप फायदा होत असतो.

प्र. रक्तदात्यांचा नक्की कशा प्रकारे फायदा होतो, असे तुम्हाला वाटते ?

दीपक चंदे - रक्तदात्याने ४५० मिली रक्तदान केल्याने आपल्या शरीरास सुमारे ६५० कॅलरी जळण्यास मदत करते. त्यामुळे नियमित रक्तदान करणाऱ्यांची वजनवाढदेखील नियंत्रणात राहते. तसेच नियमित रक्तदान केल्याने शरीरातील आयर्नची पातळी कमी होण्यास मदत होत असल्याने हृदयरोगाचा, कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. तसेच नवीन दमाच्या लाल रक्तपेशी पुन्हा तयार होऊन रक्तदाता अधिक तंदुरुस्त राहू शकतो, इतके फायदे रक्तदात्यालाही होत असल्याने स्वेच्छेने रक्तदान करावे.

प्र. रक्तदान करण्यामागे रक्तदात्याची नक्की काय भूमिका असावी ?

दीपक चंदे : रक्ताचे विविध प्रकारचे आजार, अपघातानंतरचा रक्तस्त्राव, प्रसूतिपश्चात रक्तस्त्राव, विविध शस्त्रक्रियांमध्ये रुग्णांना वेळेवर रक्त न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत रक्त तातडीने उपलब्ध झाले तरच रुग्ण वाचू शकत असल्याने प्रत्येक नागरिकाने आपण दिलेल्या रक्ताने कुणाचा तरी जीव वाचणार आहे, आपल्या सुदैवाने कुणाला तरी आपण जीवनदान देऊ शकणार असल्याची समाधानाची भावना मनात ठेवून रक्तदानासाठी पुढाकार घ्यायला हवा.

प्र. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवू नये, यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे तुम्हाला वाटते ?

दीपक चंदे : राज्यातील सर्व सामाजिक, शैक्षणिक संस्थांमधील युवक तसेच शासकीय आणि खासगी कार्यालयांतील सर्व तंदुरुस्त व्यक्तींनी नियोजनबद्धपणे वर्षातून किमान एकदा रक्तदान केल्यास राज्यात कधीच रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही. त्याबदल्यात संबंधित शिक्षण संस्थांतील कॉलेजचे विद्यार्थी, शासकीय विभाग, खासगी कार्यालये यांना काही प्रोत्साहनपर गुण किंवा सन्मानपत्र, रक्तदात्यांना एक दिवसाची सुटी दिल्यास राज्यात सदैव सरप्लस रक्तसाठा राहून महाराष्ट्र संपूर्ण देशाला रक्तपुरवठा करू शकेल, असा विश्वास वाटतो.

--------------

फोटो

२७ चंदे दीपक

लोगो

लोकमत रक्ताचं नातं हा लोगो अत्यावश्यक.

------------------------

Web Title: If there is continuity in blood donation, there will always be 'surplus' stocks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.