धारणा, धैर्य अन् निश्चय असेल तर यश निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 06:41 PM2020-01-29T18:41:50+5:302020-01-29T18:43:31+5:30
चांदोरी : क. का. वाघ शिक्षण संस्थेच्या चांदोरी येथील कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य सुरेश भोज अध्यक्षस्थानी होते.
चांदोरी : क. का. वाघ शिक्षण संस्थेच्या चांदोरी येथील कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य सुरेश भोज अध्यक्षस्थानी होते.
जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर धारणा, धैर्य व निश्चय व आत्मविश्वास अंगी बाणले पाहिजे असे प्रतिपादन प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध अभिनेते दीपक करंजीकर यांनी केले.
महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्र माप्रसंगी बोलतांना ते म्हणाले की, दैनंदिन जीवनात केलेले छोटे निश्चय आपला आत्मविश्वास प्रभावित करतात त्यातून स्वत:ला आव्हान करण्याची व यश मिळविण्याची प्रवत्ती निर्माण होते. जीवनातील दुर्गुणांना नष्ट करून सद्गुणांचा स्विकार करा, स्वत:ला सिद्ध करा. आपण सुधारलो तर जग आपोआप सुधारेल यात शंका नाही. असे ते म्हणाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांनी प्रास्ताविका क. का. वाघ शिक्षण संस्थेच्या ५० वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे यांनीही मनोगत व्यक्त केले.
उपप्राचार्य डॉ. अरु ण ठोके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. सविता भंडारे व डॉ. सविता सावंत यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. योगेश आहेर यांनी आभार मानले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत व विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला.