स्मार्टसिटीची कामे वर्षभर रखडली तर लोकांनी गैरसोयच सोसायची का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 03:04 PM2018-09-28T15:04:11+5:302018-09-28T15:05:02+5:30

पश्चिम विभाग सभा : प्रत्येक कामाचा जाब विचारल्यावर स्मार्टसीटीचे कारण पुढे, लोकप्रतिनिधी संतप्त

If the works of smartcity were kept throughout the year, would people be inconvenienced? | स्मार्टसिटीची कामे वर्षभर रखडली तर लोकांनी गैरसोयच सोसायची का?

स्मार्टसिटीची कामे वर्षभर रखडली तर लोकांनी गैरसोयच सोसायची का?

Next
ठळक मुद्देपश्चिम विभाग सभा : प्रत्येक कामाचा जाब विचारल्यावर स्मार्टसीटीचे कारण पुढे, लोकप्रतिनिधी संतप्त

नाशिक- काही भागात कमी दाबाने पाणी येते, काही भागात पाणीच येत नाही, ड्रेनेज खराब झाले असून लोकांच्या घरात त्याचे पाणी घुसत आहे या तक्रारीबाबत विचारणा केली असता ही कामे स्मार्टसिटीअंतर्गत होणार असून त्याचे टेंडर निश्चित करुन मगच कामे केले जाईल असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर संतप्त लोकप्रतिनिधींनी प्रत्येक काम स्मार्टसिटीत टाकल्यास नागरिकांनी किती काळ गैरसोय सहन करायची हे सांगा व कामांचा प्राधान्यक्रम ठरवा अशा सूचना केल्या. शुक्रवारी (दि.२८) सकाळी पश्चिम प्रभाग समितीची मासिक सभा पंडित कॉलनीतील सभागृहात पार पडली. यावेळी सभापती वैशाली भोसले, नगरसेवक गजानन शेलार, शिवाजी गांगुर्डे, प्रियंका घाटे, योगिता भामरे, हेमलता पाटील आदिंसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सभेत प्रभागातील ड्रेनेजचे काम करताना तात्पुरते कामचलाऊ न करता कॉँक्रीटीकरण करावे, गंगाघाटाच्या पुलांवर बसवेलेल्या आणि चोरीला गेलेल्या जाळ्यांची चौकशी करावी, तेथे नव्याने जाळ्या बसवाव्यात, इंद्रप्रस्थ हॉलजवळील चौफुलीवर रोज होणारे अपघात बघता तेथे नियंत्रण करावे, प्रभागातील झाडांच्या वाढलेल्या फांद्या कापाव्यात, गल्लीबोळात घंटागाड्या जाऊ शकत नसतील तर तेथील कचरा हातगाडीवर भरुन आणून तो घंटागाडीत टाकावा, उद्याने, जॉगींग ट्रॅक यातील कचरा नियमीतपणे उचलला जावा, तेथे नियमीतपणे साफसफाई केली जावी, घंटागाड्यांबाबत लोकांच्या खुप तक्रारी असून त्याबाबत कार्यवाही करावी अशा विविध सूचना यावेळी नगरसेवकांनी केल्या. पुृिल सभेत या समस्यांचे निराकरण झालेले असावे अशी अपेक्षाही त्यांनी अधिकाºयांकडून व्यक्त केली. गंगावाडी, कुंभारवाडा, नानावली इथल्या भागातील रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या वारंवार सांगूनही का छाटल्या जात नाही असा सवाल करीत सभापती वैशाली भोसले यांनी लवकर काम न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला.

Web Title: If the works of smartcity were kept throughout the year, would people be inconvenienced?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.