पेठरोडवरून जाताय, तर मग सावध रहा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 02:02 PM2019-12-11T14:02:59+5:302019-12-11T14:06:05+5:30

दोघा लूटारूंनी एका पादचाऱ्याला पेठरोडवर चक्क तलवार दाखवून रोकड, मोबाईल हिसकावून पोबारा केल्याने संताप व्यक्त होत आहे.

If you are passing through Peth Road, then be careful ...! | पेठरोडवरून जाताय, तर मग सावध रहा...!

पेठरोडवरून जाताय, तर मग सावध रहा...!

Next
ठळक मुद्देचक्क तलवार दाखवून रोकड, मोबाईल हिसकावून पोबारा या भागात लागोपाठ जबरी लूटीच्या घटना

नाशिक : मिरची पूड डोळ्यांत फेकून, तलवारीसारख्या घातक शस्त्रांचा धाक दाखवून जबरी लूटीच्या घटना पंचवटी परिसरात सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्येही भीती व्यक्त होत आहे. तसेच सरकारी मालमत्ताही चोरट्यांनी लक्ष्य केली असून एकूणच पंचवटी परिसरात पोलिसांचा वचक कमी झाला की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रिक्षातून आलेल्या दोघा लूटारूंनी एका पादचाऱ्याला पेठरोडवर चक्क तलवार दाखवून रोकड, मोबाईल हिसकावून पोबारा केल्याने संताप व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पेठरोड शनी मंदिरमागे राहणारे गणेश धंदुके हे सोमवारी (दि.९) रात्री दहा वाजेच्या सुमारास पेठरोडवरून पायी जात असताना एका रिक्षातून फुलेनगरमधील संशयित आरोपी काळू उर्फ संदेश सुधाकर पगारे, युवराज सावळीराम गायकवाड या दोघांनी रिक्षातून येऊन शिवीगाळ करत गणेश यांना रस्त्यात अडवून तलवारीचा धाक दाखविला. यावेळी त्यांच्या खिशातून ओप्पो कंपनीचा मोबाइल व अकराशे रु पयांची रोकड बळजबरीने काढून घेतली आणि ‘आमच्याविरु द्ध पोलिसांकडे तक्र ार केली तर तुला जीवंत सोडणार नाही’ असा दमदेखील भरल्याचे त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. धंदुके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा संशयितांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांपुर्वीच कर्णनगर परिसरातील रहिवाशी असलेले सुनील पवार यांना अशाचप्रकारे डोळ्यां मिरचीपूड फेकून एका टोळक्याने पेठरोडवरच लूटले होते. त्यांना जबर मारहाण देखील केल्याने जिल्हा शासकिय रूग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातदेखील संशयित हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली आहे; मात्र अद्याप पोलिसांकडून त्यांच्या मुसक्या बांधल्या जात नसल्याने पुन्हा पेठरोडवरच पादचाºयास थेट तलवारीचा दाख दाखवून लूटण्यापर्यंत मजल वाढल्याचे बोलले जात आहे.
--इन्फो--
पेठरोडवरून जाताय, सावधान....!
पेठरोडवरून सकाळी किंवा सायंकाळी जाताय, तर मग सावध रहा...., असे म्हणण्याची वेळ आता पंचवटीकरांवर आली आहे. कारण सातत्याने लागोपाठ जबरी लूटीच्या घटना या भागात घडल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण होत आहे. जबरी लूट करणारे हल्लेखोर हे अज्ञात नसून त्यांची नावेदेखील फिर्यादींकडून उघड करण्यात आली आहेत; मात्र अद्याप त्यांना बेड्या ठोकण्यास पंचवटी पोलिसांना यश आलेले नाही.

Web Title: If you are passing through Peth Road, then be careful ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.