...तेव्हा चुकला काळजाचा ठोक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 01:33 AM2017-11-28T01:33:47+5:302017-11-28T01:34:58+5:30

क्यूआरटी, अग्निशामक दल मुलांना सुरक्षित उतरविण्यासाठी जिवावर उदार होऊन प्रयत्न करत होते... डोंगरदºयांमध्ये बचावकार्यासाठी लागणारे पुरेसे साहित्य त्यांच्याकडे नव्हते... तरीदेखील बचावकार्याची मोहीम त्यांनी यशस्वी करून दाखविली; मात्र यावेळी अनर्थ होता होता टळला हे तितकेच खरे... शीघ्र कृती दलाच्या जवानांनी ज्या दगडाला दोरखंडाचा ‘यू’ केला होता तो दगड गदागदा हलत होता. शेवटचा जवान शिखरमाथ्यावरून दोरखंडाच्या साहाय्याने खाली उतरताना अखेर काही मोठे दगड निखळले.. अन् उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला...

If you are wrong, be sorry! | ...तेव्हा चुकला काळजाचा ठोक !

...तेव्हा चुकला काळजाचा ठोक !

googlenewsNext

नाशिक : क्यूआरटी, अग्निशामक दल मुलांना सुरक्षित उतरविण्यासाठी जिवावर उदार होऊन प्रयत्न करत होते... डोंगरदºयांमध्ये बचावकार्यासाठी लागणारे पुरेसे साहित्य त्यांच्याकडे नव्हते... तरीदेखील बचावकार्याची मोहीम त्यांनी यशस्वी करून दाखविली; मात्र यावेळी अनर्थ होता होता टळला हे तितकेच खरे... शीघ्र कृती दलाच्या जवानांनी ज्या दगडाला दोरखंडाचा ‘यू’ केला होता तो दगड गदागदा हलत होता. शेवटचा जवान शिखरमाथ्यावरून दोरखंडाच्या साहाय्याने खाली उतरताना अखेर काही मोठे दगड निखळले.. अन् उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला... सुदैवाने दगड वरच्या टप्प्यावर झाडाझुडुपांत अडकल्याने दुर्घटना टळली.  वैनतेय संस्थेच्या गिर्यारोहकांना पोलीस नियंत्रण कक्ष व जिल्हा आपत्ती कक्षातून सुमारे सव्वा बारा वाजेच्या सुमारास दूरध्वनीवरून सदर घटनेची माहिती देत मदतकार्यासाठी बोलविले गेले. संस्थेच्या गिर्यारोहकांनी सर्व आवश्यक त्या साधनांची जमवाजमव करीत पोलीस वाहनाच्या मदतीने एक वाजेच्या सुमारास चामरलेणी गाठली. यावेळी आठ सदस्य अवघ्या वीस मिनिटांत शिखरमाथ्यापर्यंत पोहचले. त्यावेळी तीन मुलांना ‘रेस्क्यू’ करण्यात पोलिसांना यश आले होते. ‘वैनतेय’च्या सदस्यांनी शिखरमाथा गाठून चौथ्या मुलाला दुसºया बाजूने सुखरूप खाली उतरविले. 
अपुºया साहित्यामुळे कोंडी 
डोंगरदºयात बचावकार्यासाठी  लागणाºया साधनसामग्रीचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे अभाव दिसून आला. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे चार कर्मचारी बचावकार्यासाठी सुमारे एक वाजता पोहचले; मात्र त्यांच्याकडे पुरेसे साहित्य नसल्याने कोंडी झाली. पोलीस दलाकडे असलेल्या दोरखंडाच्या माध्यमातून मोहीम राबविली जात  होती. दरम्यान, डोंगरदºयात बचावकार्याचा अनुभव पाठीशी असणाºया वैनतेय संस्थेला दुपारी सव्वा बारा वाजता जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष व आपत्ती नियंत्रण विभागातून संपर्क साधण्यात आला. 
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष गाफील  पोलीस नियंत्रण कक्षाला सकाळी साडेदहा वाजता घटनेची माहिती समजली. त्यानंतर तत्काळ पोलिसांनी मदत चामरलेणीवर पोहचविली आणि बचावकार्य हाती घेतले; मात्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन याबाबत गाफील राहिल्याचे दिसून आले. आपत्ती व्यवस्थापन विभागाला नियंत्रण कक्षाकडून ‘अलर्ट’ दिल्यानंतर त्यांना जाग आली. त्यानंतर चार कर्मचारी घटनास्थळी पोहचले. मात्र त्यांच्याकडे डोंगरदºयामध्ये बचावकार्यासाठी लागणारे पुरेसे साहित्य नसल्याने खोळंबा झाला. त्यानंतर वैनतेय संस्थेशी संपर्क साधण्यात आला आणि मदतीसाठी त्यांना पाचारण करण्यात आले. या सर्व खटाटोपात मुलांना खाली उतरविण्यास विलंब झाला. केवळ पावसाळ्यापुरते जिल्हा आपत्ती व्यवस्थापन असल्याचे यावेळी उघड झाले.

Web Title: If you are wrong, be sorry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.