उघड्यावर शौचास बसाल तर कैद व्हाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 05:02 PM2020-07-08T17:02:20+5:302020-07-08T17:02:55+5:30
सावकी गावात सीसीटीव्ही : पुरस्काराच्या रकमेतून उपक्रम
खामखेडा : गावाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व चुकीच्या गोष्टींना आळा बसावा यासाठी सावकी ता.देवळा येथील ग्रामपंचायतीने गावातील महत्त्वाच्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करत आधुनिक जगाशी नाळ जोडली आहे. चोरी, टवाळखोरी यावच वचक बसवितानाच उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवरही या कॅमेºयाद्वारे नजर ठेवली जाणार आहे.
देवळा तालुक्यातील सावकी हे गाव विविध उपक्र म राबविण्यात अग्रेसर असल्याने या ग्रामपंचायतीला नुकताच स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे. ग्रामपंचायतीने या पुरस्काराच्या रकमेतून गाव नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गावातील महत्वाच्या ठिकाणी एकूण २४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवत विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे.गावातील प्रत्येक हालचालींवर आता ग्रामपंचायतीचे नियंत्रण असणार आहे. त्यात प्रामुख्याने बस स्टँड, ग्रामपंचायत कार्यालय, फिल्टर प्लॅँट, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आदिवासी वस्ती, जवाई वाडी, सावकी पाडा याठिकाणी चारही बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ग्रामपंचायतीची या भागावर करडी नजर असणार आहे . गावात प्रवेश करणाºया पाहुण्यांवर, येणाºया वाहनांवर, फेरीवाले,भंगारवाले, भाजीवाले, सेल्समन आदि व्यक्तींच्या हालचालींवर कॅमेºयाच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे तसेच चोरी,टवाळखोरी,बेकायदेशीर गोष्टी,गुन्हेगारी तर उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना देखील आळा बसणार आहे . गावकºयांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.