हेल्मेट, सिटबेल्ट नसल्यास आता दररोज कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 01:12 AM2018-12-16T01:12:43+5:302018-12-16T01:13:01+5:30
दुचाकी अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या, चेनस्नॅचिंग तसेच दुचाकीधारकांकडून केले जाणारे वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन यामुळे शनिवारी (दि़१५) पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या आदेशावरून शहर वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांनी शहरात ‘स्पेशल हेल्मेट ड्राइव्ह’ राबविण्यात आला़
शहरातील सुरू असलेली हेल्मेट तपासणी मोहीम़
नाशिक : दुचाकी अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या, चेनस्नॅचिंग तसेच दुचाकीधारकांकडून केले जाणारे वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन यामुळे शनिवारी (दि़१५) पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या आदेशावरून शहर वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांनी शहरात ‘स्पेशल हेल्मेट ड्राइव्ह’ राबविण्यात आला़ यामध्ये हजारो दुचाकी वाहनांची तपासणी करून हेल्मेट परिधान न करणाºया दोन हजार १८९ वाहनधारकांकडून दहा लाख ९४ हजार ५०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली़
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरणे गरजेचे आहे़ नाशिकमध्ये हेल्मेटसक्ती साधारण वर्षभरापूर्वीच लागू करण्यात आली असून, येत्या जानेवारीपासून पुणे शहरातही लागू केली जाणार आहे़ हेल्मेटमुळे अनेक गंभीर अपघातातही चालकाचे प्राण वाचले आहेत़ मात्र, असे असूनही हेल्मेट वापराबाबत टाळाटाळ केली जाते़ पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार शहरातील १३ पोलीस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते़ शहरातील विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या या कारवाईमध्ये आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अधिकारी तसेच कर्मचारी तर शहर वाहतुकीच्या चारही विभागांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते़
महिनाभरातील
तीन ‘ड्राइव्ह’मध्ये
सुमारे ३९ लाखांचा दंड वसूल
शहर पोलिसांनी १६ व १७ नोव्हेंबर असे दोन दिवस हेल्मेट तपासणीसाठी विशेष मोहीम राबविली होती़ या दोन दिवसांमध्ये ४५ हजार वाहनांची तपासणी करून २८ लाख १५ हजार रुपये दंड वसूल केला होता़, तर शनिवारी (दि़१५) शहरात राबविण्यात आलेल्या हेल्मेट तपासणी मोहिमेत १० लाख ९४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़ एकूण तीन दिवस राबविलेल्या विशेष मोहिमेत दुचाकीचालकांकडून ३९ लाख ९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़
४वाहतूक नियमांचे पालन तसेच हेल्मेट, सिटबेल्ट यांचा स्वत:च्याच सुरक्षिततेसाठी वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे़ दरम्यान, यापुढे दररोज विनाहेल्मेट व सिटबेल्ट तपासणी मोहीम राबविली जाणार आहे़ (आणखी वृत्त पान / २)