घालाल हुज्जत, तर पोलिसांची बरकत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:28 AM2017-12-15T00:28:56+5:302017-12-15T00:29:26+5:30

शहराच्या कोणत्याही भागात वाहने लावताना तुम्ही ती शिस्तीत नियमांचे पालन केले असले तरी पोलिसांच्या मनात येईल तोच गुन्हा दाखल होईल. वाद घातला, पोलिसांना प्रत्युत्तर दिले की, आणखी कलमे आणि आणखी दंड... त्यामुळे वस्तुस्थिती सांगणे म्हणजे पोलिसांना ‘बरकत’ प्राप्त करून देणे, असा प्रकार शहरात घडू लागला आहे.

If you do not mind, then the police! | घालाल हुज्जत, तर पोलिसांची बरकत!

घालाल हुज्जत, तर पोलिसांची बरकत!

Next

नाशिक : शहराच्या कोणत्याही भागात वाहने लावताना तुम्ही ती शिस्तीत नियमांचे पालन केले असले तरी पोलिसांच्या मनात येईल तोच गुन्हा दाखल होईल. वाद घातला, पोलिसांना प्रत्युत्तर दिले की, आणखी कलमे आणि आणखी दंड... त्यामुळे वस्तुस्थिती सांगणे म्हणजे पोलिसांना ‘बरकत’ प्राप्त करून देणे, असा प्रकार शहरात घडू लागला आहे.
नियमभंग केला आणि त्यामुळेच पोलिसांनी अडवून कारवाई केली तर साधारणत: त्याला कोणी हरकत घेत नाही. मुळातच पोलिसांनी अडवले की, आता खैर नाही अशी सामान्यत: मानसिकता असते. त्यामुळे सहसा कोणी प्रतिप्रश्न करीत नाही. मात्र नियमांचा भंग केला नसेल किंवा नियमभंग करणारे अनेक आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला एक जण तर अशा व्यक्तींनी आपली बाजू मांडून उपयोग नसतो. बºयाचदा रहदारीला अडथळा होईल अशा रितीने मोटार उभी नसेल, परंतु केवळ त्यावर दंड भरायचे म्हटल्यास नागरिक विरोध करतात. आपण नियमभंग केलेला नाही.  रहदारीला कोणताही अडथळा झालेला नाही असे बिंबवून उपयोग नाही. अशावेळी सरळ वाद घालणाºया नागरिकाने मात्र गंभीर गुन्हा केला असल्यागत पोलीस कर्मचाºयांची भाषा सुरू होते आणि प्रसंगी जास्त बोलले किंवा पोलिसांशी हुज्जत घातली तर वाहतूक नियमभंगाची कलमे वाढत जातात. मग, कागद नव्हते, इन्शुरन्स नाही, असे अनेक नियम तपासून सर्व कलमांचे चलनही फाडले जाते.  बºयाचदा अनेक नागरिक दंड भरण्यापेक्षा कोर्टात जाण्याची तयारी दर्शवितात, परंतु अशावेळी येथेच पावती फाडण्याचा आग्रह नाही, तर कोर्टात जायचे असेल तर लायसन जप्त, असा प्रकार केला जातो. या प्रकारामुळे पोलिसांशी वाद घालणे महागात पडत असल्याने गुमान दंड भरणे हेच शहाणपणाचे ठरते असे अनुभवही काहींनी कथन केले. नियमभंगाचे कोणीच समर्थन करीत नाही, मात्र एखाद्याकडून कागदपत्रे अनवधानाने राहिली असावीत किंवा नाही हे ओळखण्याची नजर निश्चितच पोलिसांकडे असते. त्याचा वापर न करता सर्वांनाच कारवाईत भरडणे कितपत योग्य, असाही प्रश्न केला जात आहे. 
...तर सरकारी कामात अडथळा
४पोलिसांशी वाद घातला तर सहज होणारा दंडही वाढत जातो. परंतु एखादा नागरिक जास्तच आक्रमक झाल्यास सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हाही दाखल होतो. दोनेक वर्षांपूर्वी शरणपूररोडवर एका सोसायटीच्या प्रवेशद्वाराशी रोजच ठेवलेल्या बॅरिकेड्समुळे अडचण होत असल्याने वाद घालणाºया स्थानिक रहिवासी व्यक्तीला सरकारवाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. म्हणजेच वाहतूक नियमाचा भंग म्हणूनच कारवाई होते, असे काही नाही.
वाहतूक पोलिसांच्या वारंवार होणाºया कारवाईला कंटाळून अनेकदा रिक्षाचालकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे प्रकार शहरात घडले आहेत. मध्यंतरी तर एका मोटारचालकाने रस्त्यातच बैठक घातली. यासंदर्भातही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Web Title: If you do not mind, then the police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.