रुंदी वाढविल्यास बोगदा खुला
By admin | Published: August 4, 2015 12:04 AM2015-08-04T00:04:29+5:302015-08-04T00:05:43+5:30
आयुक्तांचे आश्वासन : हरकती, स्वाक्षऱ्या दाखल
नाशिक : इंदिरानगर ते
गोविंदनगरला जोडणाऱ्या बोगद्याची
महापालिका व राष्ट्रीय महामार्ग
प्राधिकरणाने रुंदी वाढविल्यास बंद
बोगदा पूर्ववत सुरू करण्यात येईल,
असे आश्वासन पोलीस आयुक्त एस.
जगन्नाथन यांनी दिले आहे. सोमवारी
इंदिरानगरवासीयांनी बोगद्याच्या
विरोधात गोळा केलेल्या
नागरिकांच्या स्वाक्षऱ्या तसेच
नगरसेवकाकडे नोंदविलेल्या हरकती
पोलीस आयुक्तांना सादर करण्यात
आल्या.
इंदिरानगरचा बोगदा पूर्ववत
सुरू करण्यात यावा, यासाठी ही
मोहीम चालविण्यात येत होती. त्यात
नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत
आपला विरोध प्रगट केला.
यापूर्वीही पोलीस आयुक्तांची या
प्रश्नी भेट घेण्यात आली; परंतु
त्याचा काही उपयोग झाला नाही.
त्यामुळे नगरसेवक डॉ. दीपाली
कुलकर्णी यांनी त्यांच्या संपर्क
कार्यालयात नागरिकांना हरकती
नोंदविण्याचे आवाहन केले होते.
जवळपास तीनशे हरकती असलेले
पत्र पोलीस आयुक्तांना देण्यात
आले. त्यावर हरकतींमधील
सूचनांचा विचार करून निर्णय
घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी
दिले, तर पाचशे नागरिकांच्या
स्वाक्षरी असलेले निवेदन दिल्यावर
पोलीस आयुक्तांनी इंदिरानगरचा
रस्ता शंभर फुटी असून त्यामानाने
बोगद्याची रुंदी अतिशय कमी आहे.
वेळोवेळी वाहतुकीची कोंडी व
अपघात होत असल्यानेच राष्ट्रीय
महामार्ग प्राधिकरणाने बोगदा बंद
करण्याची सूचना केली व त्यानुसार
तो बंद करण्यात आला. पोलीस
आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात
नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी,
सुनील काण्णव, डॉ. संदीप प्रधान,
सचिन कुलकर्णी, शैलेश निकम
यांचा तर इंदिरानगरवासीयांच्या
शिष्टमंडळात हर्षल गोखले, संतोष
काळे, अमित कोटकर, जमील पटेल
यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)