पिकवा म्हणायचं अन् पिकवलं तर खाऊ द्यायचं नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:19 AM2021-09-15T04:19:34+5:302021-09-15T04:19:34+5:30

कोट- राज्यात यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढला आहे. आपल्याकडे आहे तेच उत्पादन जास्त होणार असताना केंद्राने आयातीचा निर्णय घेतल्याने देशात ...

If you want to grow it, you don't want to eat it! | पिकवा म्हणायचं अन् पिकवलं तर खाऊ द्यायचं नाही !

पिकवा म्हणायचं अन् पिकवलं तर खाऊ द्यायचं नाही !

Next

कोट-

राज्यात यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढला आहे. आपल्याकडे आहे तेच उत्पादन जास्त होणार असताना केंद्राने आयातीचा निर्णय घेतल्याने देशात सोयाबीनबरोबरच डाळींचे दरही कोसळतील. - संदीप जगताप, स्वाभिमानी शेतकरी संघटना. (फोटो १४ संदीप जगताप)

कोट-

शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे धोरण स्वीकारले तरच देशातील शेतकरी वाचू शकणार आहे. आज कोथिंबीर, टमाट्यासारखी पिके फेकून देण्याची वेळ आली असताना सरकार कोणतेही वैचारिक धोरण राबवित नाही याचे वाईट वाटते - राजू देसले, किसान सभा (फोटो १४ राजु देसले)

कोट-

देशात डाळवर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असूनही आयातीचा निर्णय घेणे चुकीचे आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अप्रत्यक्षरीत्या मोठे नुकसान होणार आहे. देशातील शेतकऱ्यांवर हा एक प्रकारचा अन्यायच आहे. यामुळे डाळवर्गीय पिकांचे भाव कोसळतील. - हंसराज वडघुले, शेतकरी संघर्ष संघटना. (फोटो १४ हंसराज वडघुले)

कोट-

केंद्रात कोणतेही सरकार असो ते कधीच शेतकऱ्यांचा विचार करत नाहीत. याचा वारंवार प्रत्यय आला आहे. सोयाबीन आणि इतर डाळींच्या आयातीमुळे देशातील पिकांचे दर कोसळतील याचा शेतकऱ्यांना माेठा फटका बसणार आहे. अप्रत्यक्षपणे सरकार देशातील पिकांचे भाव पाडण्याचेच काम करत आहे.

- अर्जुन बोराडे, शेतकरी संघटना (फोटो १४ अर्जुन बोराडे)

Web Title: If you want to grow it, you don't want to eat it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.