पाणी टॅँकर हवे असेल तर विहीर शोधा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 03:27 PM2018-02-07T15:27:35+5:302018-02-07T15:29:07+5:30

नाशिक जिल्ह्यातील पारंपारिक टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये डिसेंबर संपताच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, विशेषत: येवला तालुक्यातील पुर्वभाग व बागलाण तालुक्यातील दुर्गम भागाचा त्यात समावेश आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला असला तरी, काही भागात जेमतेम झालेल्या पावसाने तेव्हढ्यापुरता दिलासा दिला प

If you want a water tanker then find a better one! | पाणी टॅँकर हवे असेल तर विहीर शोधा !

पाणी टॅँकर हवे असेल तर विहीर शोधा !

Next
ठळक मुद्देअजब फतवा : टंचाईग्रस्त गावांची पाण्यासाठी धावाधावटंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये डिसेंबर संपताच पिण्याच्या पाण्याची टंचाई

नाशिक : पाणी टंचाई भासत असेल तर अगोदर परिसरातील दोन किलो मीटर अंतरावर पाणी असलेल्या विहीरींचा शोध घ्या असा अजब सल्ला जिल्हा प्रशासनाने टंचाईने त्रस्त झालेल्या गावांना दिल्यामुळे प्रशासनाच्या दरबारात खेटा घालून दमलेल्या ग्रामस्थांना पाण्यासाठी विहीरींचा शोध घेण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षी खूप पाऊस झाल्याच्या आनंदात असलेल्या प्रशासनाने ग्रामीण भागातील पाणी टंचाईकडे चालविलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील पारंपारिक टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये डिसेंबर संपताच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, विशेषत: येवला तालुक्यातील पुर्वभाग व बागलाण तालुक्यातील दुर्गम भागाचा त्यात समावेश आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला असला तरी, काही भागात जेमतेम झालेल्या पावसाने तेव्हढ्यापुरता दिलासा दिला परंतु काही ठिकाणी भरपूर पाऊस पडूनही खडकाळ व मुरूमाच्या जमीनीमुळे पाऊस जमिनीत मुरू शकला नाही अशाच भागामध्ये डिसेंबर अखेर पाणी टंचाई भासू लागली आहे. येवला तालुक्यातील भारम, कोळम, कुसूमाडी, खैरगव्हाण, अहेरवाडी आदी गावांच्या विहीरींनी तळ गाठला असून, पावसाळ्यातही या गावांना पुरेसे पर्जन्यमान झालेले नाही त्यामुळे शेतीलाच नव्हे तर पिण्यासाठी देखील ग्रामस्थांना वणवण फिरावे लागत आहे. या ग्रामपंचायतींनी पाण्याच्या टॅँकरसाठी ठराव करून पंचायत समितीला सादर केले, तहसिलदार व गटविकास अधिका-यांनी संयुक्त पाहणी करून पाणी टंचाईची खात्री करून तसे प्रस्ताव जानेवारी महिन्यातच जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केले आहेत. असाच प्रकार बागलाण तालुक्यातील गोराणे, खिरमाने, चौगाव पंचक्रोशीच्या बाबतीत झाला आहे. नद्या, नाले व विहीरी आटल्यामुळे आत्तापासूनच ग्रामस्थांना पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने त्यांनीही टॅँकरची मागणी केली आहे. तथापि, जिल्हाधिकारी कार्यालय अजुनही जिल्ह्यात पडलेल्या १३५ टक्के पावसाच्या आनंदात मग्न असल्याने त्यांना टंचाईग्रस्त गावांची पाण्याची मागणी मान्य नाही. टॅँकर मागणीच्या प्रस्तावांमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी काढून तो परत पाठविण्यातच प्रशासन धन्यता मानत असून, परिणामी पाण्यासाठी टाहो फोडणा-या ग्रामीण जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू झाला आहे. टॅँकर देण्यापुर्वी टंचाईग्रस्त गावापासून दोन किलो मीटर अंतरावर असलेल्या गावांमध्ये पाणी असलेल्या विहीरी शोधण्याचा अजब सल्ला प्रशासनाने दिला आहे त्यामुळे टंचाईग्रस्त गावातील नागरिक व तहसिलदार, गटविकास अधिकारी पाण्याने भरलेल्या विहीरींच्या शोधासाठी धावाधाव करीत आहेत.

Web Title: If you want a water tanker then find a better one!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.