मन:स्वास्थ ठीक असेल तर प्रमाणपत्र सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:53 AM2018-07-31T00:53:35+5:302018-07-31T00:53:50+5:30

महापालिकेतील छळाला कंटाळून आठ दिवस बेपत्ता झालेले नगररचना विभागाचे अभियंता रवि पाटील नंतर सुखरूप परतले, परंतु मन:स्वास्थ ठीक नसल्याने ते गेले तीन महिने रजेवर होते, मात्र आता त्यांनी कामावर रुजू होण्याची तयारी दर्शविली असली तरी त्यांना आधी मन:स्वास्थ ठीक असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करा, मगच रुजू व्हा, असे प्रशासनाने सांगत परत पाठविले आहे.

If your health is okay then submit the certificate | मन:स्वास्थ ठीक असेल तर प्रमाणपत्र सादर करा

मन:स्वास्थ ठीक असेल तर प्रमाणपत्र सादर करा

googlenewsNext

नाशिक : महापालिकेतील छळाला कंटाळून आठ दिवस बेपत्ता झालेले नगररचना विभागाचे अभियंता रवि पाटील नंतर सुखरूप परतले, परंतु मन:स्वास्थ ठीक नसल्याने ते गेले तीन महिने रजेवर होते, मात्र आता त्यांनी कामावर रुजू होण्याची तयारी दर्शविली असली तरी त्यांना आधी मन:स्वास्थ ठीक असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करा, मगच रुजू व्हा, असे प्रशासनाने सांगत परत पाठविले आहे. अर्थात, आजारपणाची रजा घेतल्यानंतर ज्याप्रमाणे रुजू होताना संबंधित कर्मचाऱ्यांना तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश हे प्रशासकीय प्रक्रियेचा भाग आहे. त्यानुसार त्यांना हे प्रमाणपत्र सादर करण्याचे लेखीपत्र दिल्याचे सांगण्यात आले.
नाशिक महापालिकेत कामाचा अतिताण असल्याचे सांगण्यात येत असताना आयुक्त तुकाराम मुंढे यांची कार्यशैली त्यास कारणीभूत असल्याचे सांगितले जात होते. मार्च महिन्यात आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ कार्यक्रम सुरू झाला होता. नाशिकरोड येथील शाळा क्रमांक १२५च्या मैदानात हा कार्यक्रम होत असताना त्याच दिवशी पहाटे या कार्यक्रमासाठी जात असल्याचे सांगून पाटील घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना सकाळी त्यांची मोटार तेथेच आढळल्याने त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यामुळे कुटुंबीयांनी मोटार तपासली असताना त्यात पाटील यांनी आपण कामाच्या अति ताणामुळे जात असल्याचे नमूद केले होते, व जिवाचे बरे वाईट करणार असल्याचेही त्यात नमूद असल्याने शहरात खळबळ उडाली होती.
आठ दिवस पाटील हे बेपत्ता असल्याने अनेक शंका व कुशंका व्यक्त केल्या जात असतानाच ते पुणे येथे असल्याचे पोलिसांना कळाले आणि नंतर पोलिसांनी त्यांना सुखरूप घरी पोहोचवले. दरम्यान, पाटील यांनी महापालिकेत तत्काळ रुजू न होता आपले मनस्वास्थ ठीक नसल्याने रुजू होत नसल्याचे कारण दिले, त्यानंतर एप्रिल ते जुलैपर्यंत रजा घेतली होती.
प्रमाणपत्रानंतरच करून घेणार रूजू
 रवि पाटील आता रुजू होण्यास उत्सुक असून, त्या संदर्भात त्यांनी महापालिकेच्या प्रशासनाकडे अर्ज दिला आहे. त्यावर महापालिकेने प्रत्युत्तर दिले असून, त्यांना मुंबई येथील मेडिकल बोर्डाकडून तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे असे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्यांना रुजू करून घेतले जाणार आहे.

Web Title: If your health is okay then submit the certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.