‘शुगर फ्री गोल्ड टेबल टॉप स्विटनर्स’खात असाल तर थोडं थांबा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 09:32 PM2020-02-13T21:32:57+5:302020-02-13T21:34:27+5:30
लॅक्टोज आणि डेक्सोट्रोज हे दोन साखरद्रव्ये वापरल्याचेही नमुद केल्याचे आढळून आल्याने हा विरोधाभास असलेला दावा ग्राहकांची फसवणूकीला पुरक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. नाशिकमधून प्रशासनाच्या पथकाने सुमारे २ लाख ३९ हजार २८० रूपयांचा मोठा साठा जप्त केला आहे.
नाशिक : ‘शुगर फ्री’ म्हणून गोल्ड टेबल टॉप स्विटनर्सला पसंती देत असाल तर,थोडं सावधान....कारण या उत्पादनाच्या बाबतीत ‘शुगर फ्री’ व १०० टक्के सुरक्षित असा केला जाणारा दावा हा थोतांड असल्याचे अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर स्पष्ट झाले आहे. कारण या उत्पादनाच्या वेष्टणावरच उत्पादकाने एका बाजूला ‘शुगर फ्री’ तर दुसऱ्या बाजूला लॅक्टोज आणि डेक्सोट्रोज हे दोन साखरद्रव्ये वापरल्याचेही नमुद केल्याचे आढळून आल्याने हा विरोधाभास असलेला दावा ग्राहकांची फसवणूकीला पुरक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. नाशिकमधून प्रशासनाच्या पथकाने सुमारे २ लाख ३९ हजार २८० रूपयांचा मोठा साठा जप्त केला आहे.
अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम २४नुसार अन्नपदार्थांसंबंधात ग्राहकांची दिशाभूल करणाºया जाहिराती करु न ‘शुगर फ्री’ गोल्ड टेबल टॉप स्वीटनर्सची सर्रास विक्री सुरू होती. ही बाबल लक्षात आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने नाशिक शहरातील अन्न पदार्थांचे पंचवटीमधील सुपर स्टॉकिस्ट मे.जे.के. अॅण्ड सन्स, रविवार कारंजावरील मे.प्रफुल्ल ट्रेडर्स या घाऊक व्यावसायिकांकडून प्रत्येकी अनुक्रमे १लाख ३६ हजार २१० रूपये तर १ लाख ३ हजार ७० रूपये असा २ लाख ३९ हजार २८० रूपयांचा साठा जप्त केला आहे.
साखरेऐवजी कृत्रिम गोडी आणणारे खाद्यपदार्थ वापरण्यात नागरिकांचा कल आहे. त्यामुळे असे खाद्यपदार्थांमध्ये ‘शुगर फ्री टेबल टॉप स्विटनर’ हा एक प्रसिध्द व नामांकित ब्रॅन्ड आहे. या ब्रँडनेही १०० टक्के सुरक्षीत अशी जाहिरात करु न विक्र ी वर भर दिला. मात्र त्यांच्या खाद्यपदार्थाच्या वेष्टणावर उत्पादनात अॅसपारटेम नावाचा घटक असल्याने लहान मुलांसाठी व फेनाईल केटोनोरीया या आजाराचय रु ग्णांसाठी उत्पादन योग्य नसल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे. उत्पादनावरील सामविष्ट घटक ांच्या यादीतील विसंगत माहितीमुळे ग्राहकांची फसवणूक होण्याचा धोका अन्न व औषध प्रशासनाच्या लक्षात आला. त्यामुळे सहायक आयुक्त सी.डी.राठोड, व सह आयुक्त सी.डी.साळुंके यांच्या आदेशान्वये अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर, संदीप देवरे यांनी रविवार कारंजा, पंचवटी परिसरातील दोन घाऊक व्यापाऱ्यांकडून या उत्पादनाचा मोठा साठा जप्त केला. आहे. या उत्पादनाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. पुढील तपास बाविस्कर व देवरे हे करीत आहेत.