इगतपुरी दरोड्याचा उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:59 AM2017-10-30T00:59:08+5:302017-10-30T00:59:13+5:30

इगतपुरी तालुक्यातील एका हॉटेलचा मॅनेजर व महिला कामगार कारने घरी परतत असताना पारदेवी मंदिराच्या खिंडीजवळील रस्त्यावर दगड टाकून कार अडवून टाकण्यात आलेला दरोडा व मारहाणीचा नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासांत उलगडा केला आहे़ या प्रकरणी इगतपुरी तालुक्यातील गिरणारे येथील सात संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे २५ हजारांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे़

 Igatpuri Draft Detection | इगतपुरी दरोड्याचा उलगडा

इगतपुरी दरोड्याचा उलगडा

Next

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील एका हॉटेलचा मॅनेजर व महिला कामगार कारने घरी परतत असताना पारदेवी मंदिराच्या खिंडीजवळील रस्त्यावर दगड टाकून कार अडवून टाकण्यात आलेला दरोडा व मारहाणीचा नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासांत उलगडा केला आहे़ या प्रकरणी इगतपुरी तालुक्यातील गिरणारे येथील सात संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे २५ हजारांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे़  मुंबईतील अल्पवयीन मुलींच्या अश्लील नृत्य प्रकरणी काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी छापा टाकलेले हॉटेल रेन फॉरेस्टचे मॅनेजर हुकूम धामे व दोन रिसेप्शनिस्ट महिला शुक्रवारी (दि़ २७) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास कामकाज आटोपून स्विफ्ट डिझायर कारने (एमएच १५, एफएफ ४७२४) इगतपुरीला जात होते़ पारदेवी मंदिराच्या खिंडीजवळील चढावर रस्त्यावर दगड आडवे लावून आठ ते दहा संशयितांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करून काचा फोडल्या़ तसेच मॅनेजर धामे व महिलांना मारहाण करून त्यांच्याकडील पर्स, घड्याळ असा २ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला़ या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि़२८) दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला़  ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीन दुनगहू, आशिष अडसूळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ गुरुळे, रामभाऊ मुंढे, पोलीस हवालदार शिवाजी जुंदरे, बंडू ठाकरे, पोलीस शिपाई संदीप हांडगे, सचिन पिंगळ, सुशांत मरकड, हेमंत गिलबिले, संदीप लगड, प्रदीप बहिरम, चालक रानडे यांनी ही कामगिरी केली़
माहितीवरून कारवाई
दरोडेखोर आसपासच्या गावातीलच असल्याची पोलिसांची खात्री पटली होती.तसेच खबºयामार्फत मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी इगतपुरी तालुक्यातील गिरणारे येथील दीपक मच्छिंद्र लहाने (२७), प्रकाश मच्छिंद्र लहाने (२२) या दोघांना ताब्यात घेतले़ या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी साथीदार सचिन काशीनाथ गिते (२२), मनोज अर्जुन डावखर (२२), विकास अर्जुन डावखर (२३), अमोल गोपाळ खारके (१९, सर्व रा. गिरणारे, ता़ इगतपुरी) व संतोष रामदास गिते (३२, रा़ तळोशी, ता़ इगतपुरी) यांच्यासोबत मिळून दरोडा टाकल्याची कबुली दिली़ पोलिसांनी या संशयितांकडून लुटून नेलेली पर्स व २४ हजार ३६० रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे़

Web Title:  Igatpuri Draft Detection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.