इगतपुरीत अतिक्र मण निर्मूलन मोहीम

By admin | Published: January 16, 2016 10:26 PM2016-01-16T22:26:53+5:302016-01-16T22:29:24+5:30

इगतपुरीत अतिक्र मण निर्मूलन मोहीम

Igatpuri hybridization eradication campaign | इगतपुरीत अतिक्र मण निर्मूलन मोहीम

इगतपुरीत अतिक्र मण निर्मूलन मोहीम

Next

इगतपुरी : नगरपालिका हद्दीतील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणावर आज नगरपालिका प्रशासनाने जेसीबी चालवून अतिक्रमणे हटविली. यात लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना फटका बसला.
अतिक्रमण मोहिमेत शेकडो व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून, शनिवारी दिवसभर अतिक्र मण मोहीम सुरू असल्याने संपूर्ण व्यापारीपेठ बंद ठेवण्यात आली होती. शहरातील मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावरील दोन्ही बाजूचे ओटे, दरवाजे, अतिक्र मित शेड, भिंती आज जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले. अनेक दुकानदारांचे दुकाने या अतिक्र मण मोहिमेत गायब झाल्याने त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे.
या अतिक्रमण मोहिमेसाठी प्रांताधिकारी बाळासाहेब वाक्चौरे, प्रभारी तहसीलदार प्रवीण चव्हाणके, प्रभारी मुख्याधिकारी डॉ. मटांडा राजा दयानिधी, नायब तहसीलदार जितेंद्र केदारे, निवासी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर, इंजिनिअर यशवंत ताठे यांच्यासह नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल अंबावणे व पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
या अतिक्रमण मोहिमेत बाजारपेठेतील सर्वसामान्य व अल्पसंख्याक व्यापाऱ्यांचेच छोटे- मोठे व्यवसाय आहे. कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता अतिक्रमण काढले असून, शेकडो लहान व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या घटनेचा तीव्र शब्दात
निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी
केला असून, या अतिक्रमण मोहिमेत पूर्णपणे रस्त्यावर आलेल्या
छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी नगरपालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रल्हाद जाधव यांनी केली
आहे. (वार्ताहर)

Web Title: Igatpuri hybridization eradication campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.