इगतपुरी पालिका निवडणूक सर्वच पक्ष उमेदवारांच्या चाचपणीत व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:39 PM2017-11-12T23:39:30+5:302017-11-13T00:12:40+5:30

इगतपुरी नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजल्याने नागरिकांत उत्सुकता निर्माण झाली आहे. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडणूक हे यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे.

Igatpuri municipality elections are contesting all candidates candidates | इगतपुरी पालिका निवडणूक सर्वच पक्ष उमेदवारांच्या चाचपणीत व्यस्त

इगतपुरी पालिका निवडणूक सर्वच पक्ष उमेदवारांच्या चाचपणीत व्यस्त

Next
ठळक मुद्देयंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणारप्रभागातून उमेदवारी मिळण्यासाठी मोठी दमछाकभाजपा विकासाच्या मुद्द्यावर रिंगणात उभी

इगतपुरी : इगतपुरी नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजल्याने नागरिकांत उत्सुकता निर्माण झाली आहे. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडणूक हे यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारण असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी पहावयास मिळत असल्याने यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे नक्की.
इगतपुरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नऊ प्रभागांची निर्मिती करण्यात आली असून, यातून प्रत्येकी दोन असे अठरा सदस्य निवडून द्यायचे आहे. सर्वच पक्ष विजयासाठी गणित मांडण्यात व्यस्त आहे. अनेक इच्छुकांची प्रभागातून उमेदवारी मिळण्यासाठी मोठी दमछाक होत आहे, तर काही प्रभागामध्ये उमेदवारांची भाऊगर्दी झाल्याने मोठी डोकेदुखी ठरली आहे. शिवसेना, भाजपा, इगतपुरी शहर परिवर्तन आघाडी व कॉँग्रेस सर्वच जागा लढणार असल्याने पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. मात्र राष्ट्रवादी, मनसे, रिपाइंची काय भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात भाजपा-शिवसेनेची युती असताना इगतपुरी नगरपालिकेच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे आहेत. गेल्या २५ वर्षांपासून इगतपुरी पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. भाजपा एकदाही सत्तेत आलेले नाही. सत्ताधाºयांकडून २५ वर्षांत शहराचा विकास न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. फिरोज पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपा विकासाच्या मुद्द्यावर रिंगणात उभी आहे. याचा भाजपाला मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या गोपनीय बैठका सुरू असून, राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. इगतपुरी नगर परिषदेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत युवकांनी पुढाकार घेतल्याने कित्येक वर्षांपासून सत्ता भोगणाºयाची मात्र झोपच उडाली आहे. कधी कोणाला स्वत:हून नमस्कार न करणारे आता गावातील गल्ली-बोळात पायी फिरताना रामराम करताना दिसू लागले आहेत.

Web Title: Igatpuri municipality elections are contesting all candidates candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.