इगतपुरी तालुक्यात बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 05:06 PM2021-08-09T17:06:33+5:302021-08-09T17:06:42+5:30

घोटी : गेल्या आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील भरवीर खुर्द शिवारात १३ शेळ्यांचा फडशा पाडणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी या परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर असल्याने नेहमीच बंदोबस्त व्हावा, ही अपेक्षा व्यक्त होत आहे.

Igatpuri palate leopard confiscated | इगतपुरी तालुक्यात बिबट्या जेरबंद

इगतपुरी तालुक्यात बिबट्या जेरबंद

googlenewsNext

घोटी : गेल्या आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील भरवीर खुर्द शिवारात १३ शेळ्यांचा फडशा पाडणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी या परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर असल्याने नेहमीच बंदोबस्त व्हावा, ही अपेक्षा व्यक्त होत आहे.
इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथील शिंदे मळा (टेंभाडी) भागात गत मंगळवारी रात्रीच्या सुमारास बाळू किसन शिंदे यांच्या घराजवळील शेळी शेडमधून बिबट्याने १३ शेळ्या फस्त केल्या होत्या. १३ शेळ्यांपैकी ८ शेळ्या मृतावस्थेत सापडल्या होत्या. ५ शेळ्या अद्यापही गायब आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. याआधीही या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याने दहशत माजवलेली असून भरवीर खुर्द आणि परिसरात भीतीचे सावट पसरलेले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात आली होती.
दरम्यान, बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावून वनविभागाने गस्त सुरू ठेवली होती. सात दिवसांनी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा बिबट्या मादी असून, वय अंदाजे तीन वर्षे असावे, असे नमूद केले. इगतपुरी वन परिक्षेत्र अधिकारी एम. बी. पाटील, परिमंडळ अधिकारी डी. एस. ढोन्नर, वनरक्षक संतोष बोडके, एफ. ए. सय्यद आदी उपस्थित होते.

Web Title: Igatpuri palate leopard confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक