त्या पोलीसाला कठोर शिक्षेसाठी इगतपुरी पोलीसांना सर्वपक्षीय निवेदनह्यत्याह्ण पोलीसाला कठोर शिक्षेसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 05:04 PM2021-01-18T17:04:15+5:302021-01-18T17:05:21+5:30
इगतपुरी : शहरातील तळेगाव येथे रहिवासी असलेला लोहमार्ग पोलीस कर्मचारी राहुल मोरे याने व त्याच्या पत्नीने लहान मुलांना अमानुष मारहाण करून शरीरावर चटके दिले. या घटनेच्या निषेर्धात सर्वपक्षीयांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.१८) सहायक. पोलीस निरिक्षक दिपक पाटील यांना निवेदन देण्यात आले .

शुक्रवारी (दि.१५) झालेल्या घटनेत लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोलीस नोकरी करीत असलेला राहुल मोरे, त्याची दुसरी पत्नी यांनी पहिल्या पत्नीपासुन झालेल्या मुलगा व मुलगी यांना सतत एक महिना अमानुष मारहाण केली. यात जखमी झालेल्या मुलांच्या केवीलवाण्या हाकेची संपुर्ण जिल्हयात हळहळ व्यक्त केली गेली.
लहान मुलांना क्रुरतेने मारणाऱ्या अशा नराधमांना कठोर शिक्षा व्हावी व समाजात पुन्हा अशी घटना घडू नये या करीता झालेल्या घटनेचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेस व सर्वपक्षीयांच्या उपस्थितीत इगतपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वसीम सैयद, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे, जेष्ठ नेते रघुनाथ तोकडे, माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, पंचायत समिती माजी सभापती विष्णु पाटील चव्हाण, अनिल भोपे, रामदास गव्हाणे, पंढरी डाके, नगरसेवक संपत डावखर, माजी नगरसेवक मिलिंद हिरेआदींसह कार्यकर्ते उपस्थीत होते.