इगतपुरीत ७८०८४ टक्के पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 03:36 PM2020-08-16T15:36:45+5:302020-08-16T15:38:02+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून संततधार सुरु असून आज दिवसभरात ८१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर २५२१ मिमी पाऊस नोंदविला गेला आहे. तर वार्षीक सरासरीच्या ८५ टक्के पाऊस पडल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

दारणा धरणातून विसर्ग सुरू असून पाऊस असाच सुरु राहिला तर टप्याटप्याने विसर्गात वाढ करण्यात येत्या काही दिवसांत दारणा धरण देखील १०० टक्के भरले जाईल अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. निसर्ग वादळाच्या अतिवृष्टी नंतरच्या दहा आठवड्याच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा शनिवारपासून पावसाची संततधार सुरु झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस पडत असल्याने भात खाचरात मोठया प्रमाणात पाणी साचून नदी नाले पुन्हा दुथडी भरु न वाहू लागले आहेत. भात पिकासाठी पाऊस पोषक असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र पाऊस असाच सुरु राहिला तर दारणा धरणाबरोबरच मुकणे धरणाच्याही विसर्गात वाढ करण्यात येणार असून धरणावरील नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी धरण क्षेत्रात जावू नये असा सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. रविारी सुरू असलेल्या सततधारेने भाम, मुकणे, वाकी खापरी, आदीं धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली असून भावली धरण या आधीच ओव्हरफ्लो झाले आहे.
इगतपुरी तालुक्यातील धरणांचा सद्यस्थितीत असलेला जलसाठा.
धरण द.ल.घ.फू. टक्के
दारणा धरण - ६५५७ ९१७२
मुकणे - ४२८२ ५९.१६
भावली - १४३४ १००
भाम - २४६४ १००
वाकी खापरी - ११८८ ४७६७.