इगतपुरी रिव्हेन्यू संघाने पटकावले अजिंक्यपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 11:51 PM2021-03-02T23:51:10+5:302021-03-03T00:43:00+5:30

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील तीर्थक्षेत्र सर्वतीर्थ टाकेद बु. येथे एच. के. रायडर्स कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या टाकेद खेड गट आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इगतपुरीच्या रिव्हेन्यू संघाने विजय मिळविला.

Igatpuri Revenue team won the title | इगतपुरी रिव्हेन्यू संघाने पटकावले अजिंक्यपद

इगतपुरी रिव्हेन्यू संघाने पटकावले अजिंक्यपद

Next
ठळक मुद्देटाकेद आमदार चषक : क्रिकेट स्पर्धेत २० संघ सहभागी

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील तीर्थक्षेत्र सर्वतीर्थ टाकेद बु. येथे एच. के. रायडर्स कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या टाकेद खेड गट आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इगतपुरीच्या रिव्हेन्यू संघाने विजय मिळविला.

गेल्या वीस दिवसांपासून टाकेद तीर्थावर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे सामने रंगले होते. सामन्यांमध्ये एकूण ३० संघ सहभागी झाले होते. स्पर्धेला पंच म्हणून गणेश रोंगटे, अमृता भांगरे यांनी काम पाहिले, तर हभप अशोक भारती, किरण साबळे, नवनाथ साबळे यांनी कॉमेंट्री करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, इगतपुरी पंचायत समिती माजी उपसभापती उपसभापती पांडुरंग वारुंगसे, गटनेते वसंत भोसले, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सुनील वाजे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, गजानन मित्रमंडळ अध्यक्ष विनोद कडू, टाकेद ग्रामपंचायत सदस्य विक्रम भांगे आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी इगतपुरी तालुका तालीम संघ उपाध्यक्ष भगवान जुंदरे, टाकेद बु.च्या सरपंच ताराबाई रतन बांबळे, वासाळी ग्रामपंचायतचे सरपंच काशीनाथ कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष नथू पिचड, संदीप झनकर, नवनाथ साबळे, नवनाथ लहंगे, बाळू बरे यांचे सहकार्य लाभले. टाकेद तीर्थ संस्थानचे महंत किशोरदास श्रीवैष्णव यांनी या स्पर्धेला तीर्थ मैदान उपलब्ध करून दिले.

विजेत्यांना रोख पारितोषिके
स्पर्धेतील विजेत्या संघास ५१ हजार रुपयांचे पारितोषिक इगतपुरी रेव्हेन्यू संघाला देण्यात आले, तर द्वितीय ३१ हजार रुपये पारितोषिक एच रायडर्स संघ भंडारदरा वाडी टाकेद, तृतीय एकवीस हजार रुपयांचे पारितोषिक घोटी संघ, चतुर्थ ११ हजार रुपयांचे पारितोषिक भरवीर क्रिकेट संघास देण्यात आले.



 

Web Title: Igatpuri Revenue team won the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.