इगतपुरीमधील संधींचा लाभ घ्या, 'सर्वप्रथम डेव्हलपर'ने मोक्याच्या जागेला दिले महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 12:49 PM2023-09-23T12:49:57+5:302023-09-23T12:57:43+5:30

मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या सर्वप्रथमच्या प्रोजेक्टपासून इगतपुरी, नाशिक, शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर ही ४ लोकप्रिय पर्यटनस्थळे जवळ आहेत.

Igatpuri sarvppratham Developers new projects values strategic location shirdi nashik triambakeshwar | इगतपुरीमधील संधींचा लाभ घ्या, 'सर्वप्रथम डेव्हलपर'ने मोक्याच्या जागेला दिले महत्त्व

इगतपुरीमधील संधींचा लाभ घ्या, 'सर्वप्रथम डेव्हलपर'ने मोक्याच्या जागेला दिले महत्त्व

googlenewsNext

मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या सर्वप्रथमच्या प्रोजेक्टपासून इगतपुरी, नाशिक, शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर ही ४ लोकप्रिय पर्यटनस्थळे जवळ आहेत. हे प्रकल्प मुंबई व नाशिकदरम्यान असलेल्या  इगतपुरीमधील गोंदेदुमाला या भरभराटीला येऊ घातलेल्या कमर्शिअल हबवरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या ठिकाणी आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे हा भाग मध्य रेल्वे मार्गाला जोडलेला आहे आणि मुंबईची लोकल ट्रेन सेवा कसाऱ्यावरून या प्रकल्पाजवळ असलेल्या पाडली स्थानकापर्यंत विस्तारित करण्याची योजना आहे. लवकरच खुला होत घातलेल्या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून हा प्रकल्प मुंबई व उत्तर महाराष्ट्राशी जोडला जाणार आहे. ठाणे-भिवंडी कनेक्टरचे रुंदीकरण सुरू आहे आणि मुंबईतील पश्चिम उपनगरातील रहिवासी बोरिवली-ठाणे भुयारी मार्गाच्या माध्यमातून जोडले जातील. या सर्व पायाभूत सुविधा उपक्रमांमुळे प्रवासाचा वेळेची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे.

उत्तम जोडणीव्यतिरिक्त, या परिसरात सॅमसोनाइट, थायसेनक्रप, पार्ले आणि जिंदालसारख्या १०० हून अधिक बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्या आहेत. परिणामी, उत्तम वेतन असणारे प्रोफेशनल या भागात येऊन राहत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मिळणारे भाडेही अधिक आहे आणि ऑक्युपन्सी दर सुमारे १०० टक्के आहे.

पायाभूत सुविधा हाकेच्या अंतरावर
सुविधाजनक राहणीमान आणि गुंतवणूकसुलभता यावर कंपनीने भर दिलेला आहे. त्यांच्या प्रकल्पांमध्ये सर्व आवश्यक पायाभूत सुविधा हाकेच्या अंतरावर असतात. बाजारपेठा, दुकाने, बँका, एटीएम, वैद्यकीय सुविधा, खानपानगृहे, हॉटेल्स आणि फॅक्टरी आउटलेट्सही या परिसरात असून त्यामुळे प्रत्येक गरज भागवली जाते. त्याचप्रमाणे सर्वप्रथमतर्फे रेंटल असिस्टन्स, इन-हाउस देखभाल सुविधा, प्रॉपर्टी अपग्रेडशी संबंधित सहाय्य आणि रिसेलसाठीही मदत करण्यात येते. मुंबई, नाशिक आणि इगतपुरीला या कंपनीची कार्यालये असून ग्राहकांना त्यांच्या सोयीसाठी प्राथमिक निवासाच्या जागेच्या जवळ असलेल्या कार्यालयातून सेवा प्रदान करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

"मोक्याचे ठिकाण, उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता, गुंतवणूकवृद्धी या सगळ्या घटकांसंदर्भात मी विविध प्रॉपर्टींचा अभ्यास केला. या ठिकाणी या तीनही घटकांची सांगड घातलेली मला दिसून आली आणि त्यानंतरच मी येथे गुंतवणूक केली. माझ्या कुटुंबासाठी घेतलेला हा एक उत्तम निर्णय आहे. सातत्याने भाववाढ होत जाणाऱ्या मालमत्तेत गुंतवणूक करून मी मुलांचे भविष्य सुरक्षित केले आहे, त्याचप्रमाणे या प्रॉपर्टीच्या भाड्यातून मी ईएमआय भरत आहे. मी जेव्हा गुंतवणूक केली होती तेव्हाच्या भाड्यात आता दुपटीने वाढ झाली आहे," अशी प्रतिक्रिया मुंबईतील गुंतवणूकदार महेश दोंदे यांनी दिली.

वाजवी दरात सुविधा
जे ग्राहक आपल्या सेकंड होमसाठी या ठिकाणाची निवड करत आहेत, त्यांना सर्वप्रथमचे प्रोजेक्ट वाजवी मेटनेनन्स खर्चात सर्व आवश्यक गरजा पुरवतात. हे ठिकाणी मुकाणे धरणाजवळ आहे. त्याचप्रमाणे तलावाला लागून असलेले अनेक पिकनिक स्पॉट्स, हायकिंग ट्रेल्स, व्हॅलोन विनयार्ड्ससारखी प्रसिद्ध विनयार्ड्स, लीझर डायनिंग पर्याय, वाबी साबी रिसॉर्ट्स ही ठिकाणेही या प्रकल्पांपासून जवळ आहेत. सर्वप्रथम डेव्हलपरचे 'पाम हिल्स व्हिलाज' व 'आनंदवन अपार्टमेंट्स' हे प्रकल्प सध्या सुरू आहेत आणि हायवे प्लाझा शॉपिंग कॉम्प्लेक्स हा आगामी प्रकल्प आहे. सर्वप्रथमने अलीकडेच ३५० पेक्षा अधिक आनंदी कुटुंबांचा एक सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी ब्रँड ॲम्बेसेडर किशोरी शहाणे आणि 'सर्वप्रथम परिवारा'चे सदस्य उपस्थित होते.

सर्वप्रथमची स्थापना २००६ मध्ये करण्यात आली. जमीन एकत्रीकरण (लँड कन्सॉलिडेशन) करणे हा सर्वप्रथमचा मूळ व्यवसाय होता. आता इगतपुरी, नाशिक भागात ते आघाडीचे बिल्डर व लँड डेव्हलपर ब्रँड आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Web Title: Igatpuri sarvppratham Developers new projects values strategic location shirdi nashik triambakeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.