इगतपुरी, दिंडोरीत शिवसेना विजयी

By admin | Published: February 24, 2017 12:32 AM2017-02-24T00:32:15+5:302017-02-24T00:32:27+5:30

इगतपुरी, दिंडोरीत शिवसेना विजयी

Igatpuri, Shiv Sena won in Dindori | इगतपुरी, दिंडोरीत शिवसेना विजयी

इगतपुरी, दिंडोरीत शिवसेना विजयी

Next

दिंडोरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळाले असून, माजी आमदार धनराज महाले गटात निवडून आले आहेत. राष्ट्रवादी व भाजपाला आपल्या जागा गमवाव्या लागल्या असून, दारुण पराभवाची नामुष्की सहन करावी लागली आहे. गेली पाच वर्ष विजनवासात असलेल्या कॉँग्रेसचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांचे पुनरागमन झाले आहे. या निकालाने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांना मोठा धक्का बसला आहे, तर शिवसेना कॉँग्रेसचे आजी माजी आमदार धनराज महाले, रामदास चारोस्कर यांना उभारी देणारा ठरणार आहे. विद्यमान सभापती अलका चौधरी, विद्यमान पं.स. सदस्य
भास्कर भगरे, शरद कोरडे, माजी सदस्य श्याम बोडके, माजी सभापती, वणीच्या सरपंच सुनीता भरसट यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
जिल्हा परिषदेत शिवसेनेला चार, तर कॉँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत तर पंचायत समितीत शिवसेना सहा जागा मिळवत सत्तेच्या जवळ गेली आहे. त्यांना बहुमतासाठी एका जागेची आवश्यकता असून, शिवसेनेने हकालपट्टी केलेले उत्तम जाधव अपक्ष म्हणून विजयी झाल्याने त्यांची भूमिका किंगमेकर म्हणून राहणार आहे. कॉँग्रेसला तीन तर राष्ट्रवादी कॉँग्रेसला दोनच जागांवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसला या दारूण पराभवाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी गट हा आमदार नरहरी झिरवाळ यांचा बालेकिल्ला मानला जात होता; मात्र या निवडणुकीत धक्का बसला आहे. शिवसेनेच्या रोहिणी गावित यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गोपिकाबाई गांगोडे यांचा १७९६ मतांनी पराभव केला.
या गटात कॉँग्रेसच्या ताराबाई राऊत यांना ४६६७ व अपक्ष वैशाली शिंगाडे यांना ४६४७ लक्षणीय मते घेतली विद्यमान सभापती अलका चौधरी यांनी २२३७ मते मिळवली आहे. (लोकमत ब्युरो)कोचरगाव गटात कॉँग्रेसचे कमबॅक४एकेकाळी कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेला कोचरगाव गट दोन पंचवार्षिक पासून राष्ट्रवादीने मिळवत वर्चस्व मिळवले होते; मात्र यंदा कॉँग्रेसने राजकीय डावपेच खेळत हा गट ताब्यात घेतला. कॉँग्रेसचे अशोक टोंगारे यांनी राष्ट्रवादीचे सुदाम पवार यांचा तब्बल २४१५ मतांनी दारूण पराभव केला. कोचरगाव गणातही कॉँग्रेसचे वसंत थेटे यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष भास्कर पताडे यांचा २१५९ मतांनी पराभव केला. ननाशी गणात मात्र राष्ट्रवादीचे हिरामण महाले यांनी कॉँग्रेसचे सुरेश भोये यांचा १८९ मतांनी पराभव केला. उमराळे गटात कॉँग्रेसचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी विधानसभेप्रमाणे आपले वर्चस्व कायम ठेवत गट गणावर प्रभुत्व
मिळवत राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजपाला पराभूत केले. कॉँग्रेसच्या सुनीता चारोस्कर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे हिरामण गावित यांचा तब्बल ५१५६ मतांनी पराभव केला.पंचायत समितीवर एकहाती सत्ता
४इगतपुरी पंचायत समितीवर शिवसेनेने सात जागा जिंकत बहुमत प्राप्त केले असून, आगामी सभापतिपद अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित असल्याने खंबाळे आणि खेड गणातील विजयी महिला उमेदवाराच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. शिवसेनेने नांदगाव सदो गट पुन्हा ताब्यात घेतला असून, या गटात शिवसेनेचे कावजी ठाकरे यांनी काँग्रेसचे मनोहर घोडे यांचा पराभव केला, तर खेड गटातही शिवसेनेने बाजी मारीत हरिदास लोहकरे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला. दरम्यान, शिरसाटे गटातून माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या पत्नी सुशीला मेंगाळ यांना धूळ चारली. पंचायत समितीच्या दहा गणांपैकी सात गणात शिवसेनेने बाजी मारली. यात खंबाळे गणातून कल्पना हिंदोळे, वाडीवऱ्हे गणातून जिजाबाई नाठे, मुंढेगाव गणातून विमल तोकडे, नांदगाव सदो गणातून भगवान आडोळे, काळुस्ते गणातून विठ्ठल लंगडे, टाकेद गणातून विमल गाढवे व खेड गणातून जया कचरे या विजयी झाल्या तर भाजपाने घोटी गणात बाजी मारली असून, या गणातून मच्छिंद्र पवार विजयी झाले आहे. काँग्रेसने नांदगाव बुद्रूक येथील एक जागा राखली असून, या गणातून सोमनाथ जोशी हे विजयी झाले तर राष्ट्रवादीलाही अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. शिरसाटे गणातून राष्ट्रवादीच्या कौसाबाई करवंदे विजयी झाल्या.

Web Title: Igatpuri, Shiv Sena won in Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.