इगतपुरी, सिन्नरला घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:01 AM2018-08-06T00:01:03+5:302018-08-06T00:01:26+5:30
इगतपुरी : शहरातील ख्रिश्चन कॉलनी येथे तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास घराच्या लोखंडी दरवाजाची जाळी कापून प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले सुमारे अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
इगतपुरी : शहरातील ख्रिश्चन कॉलनी येथे तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास घराच्या लोखंडी दरवाजाची जाळी कापून प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले सुमारे अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, चोºयांच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान असून, अद्याप एकही आरोपी पकडण्यास पोलिसांना यश आले नसल्याने शहरात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.
शहरातील कॉन्व्हेंट हायस्कूलजवळील रहदारीच्या वस्तीत असलेल्या ख्रिश्चन कॉलनीते राहणारे फिलीप जॉन दास यांच्या घरात शनिवारी रात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी लोखंडी दरवाजाची जाळी कापून प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ५० हजार किंमतीची २५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, २० हजार किमतीची १० ग्रॅमची सोन्याची अंगठी, १६ हजार किमतीची अंगठी, १० हजार किमतीची सोन्याची अंगठी, २० हजारांचे सोन्याचे नेकलेस, १० हजार किमतीचे सोन्याचे कानतले, ६ हजार किमतीचे सोन्याचे पेंडल, २० हजार किमतीचे सोन्याची साखळी, १० हजार किमतीचे सोन्याच्या ५ बाळअंगठ्या, ३ हजार किमतीये चांदीचे तीन जोड पैंजण, दीड हजाराचा चांदीचा कमरबंद, ३० हजारांचे मंगळसूत्र, ६ हजारांचे ओमपान, ३४ हजारांची सोन्याची साखळी व १५ हजार रु पये रोख असा एकूण २ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
चोरीची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, सहायक पोलीस निरिक्षक महेश मांडवे यांनी धाव घेत पंचनामा केला. संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे समजते. ज्या घरात चोरी झाली त्या घरी काही दिवसांनी लग्न असल्याचे समजते.
या जबरी चोरीमुळे शहरात खळबळ उडाली असून, मागील काही महिन्यात शहर भागात चार-पाच घरफोड्या झाल्या आहेत. मात्र त्यातील एकाही चोरीचा छडा लावण्यास पोलिसांना यश आलेले नाही. या जबरी चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.दागिने लांबविलेसिन्नर : शहरातील शिवाजीनगर परिसरातील नाईक मळा भागात असलेल्या ऋ तुरंग पार्कमधील बंद फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडी करत सुमारे ९ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ४ हजार रु पये रोख असा ऐवज लांबविल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. नांदूरशिंगोटे येथील शरदचंद्र घुले हे ऋ तुरंग पार्कमध्ये कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. शनिवारी (दि.४) घुले कुटुंबीय गावी गेलेले असल्याने त्यांच्या फ्लॅटला कुलूप होते. सिन्नर पोलिसांनी केला पंचनामा शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी घुले यांच्या फ्लॅटच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील लाकडी कपाट आणि इतर ठिकाणी उचकापाचक करून कपाटात ठेवलेले साडेचार तोळे वजनाची सोन्याची पोत, ५ तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस व ४ हजार रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. पहाटे ३.४५ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर घुले यांना माहिती देण्यात आली.
घुले यांनी तत्काळ सिन्नर येथे धाव घेऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे लक्षात आले. घुले यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात चोरीची झाल्याची माहिती दिली.
सहायक पोलीस निरीक्षक आर. बी. लोखंडे यांच्यासह कर्मचाºयांनी तातडीने धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.