इगतपुरी तालुक्यात १२ टक्के क्षेत्रात भात लागवड पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 01:13 PM2019-07-12T13:13:36+5:302019-07-12T13:13:49+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यात पावसाने गेल्या काही दिवसांपासुन सर्वत्र दमदार हजेरी लावल्यानंतर तालुक्यातील सर्वच भागात भात लावणीच्या कामांनी वेग धरला आहे.
घोटी : इगतपुरी तालुक्यात पावसाने गेल्या काही दिवसांपासुन सर्वत्र दमदार हजेरी लावल्यानंतर तालुक्यातील सर्वच भागात भात लावणीच्या कामांनी वेग धरला आहे. तालुक्यात १३१ महसुली गावे आणि १५० हून अधिक पाडे आहेत. यावर्षी २२,८६९ हेक्टरवर भाताची लागवड अपेक्षित असून यापैकी ३०४१ हेक्टर अर्थात १२ टक्के क्षेत्रात भात लागवड पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसात संपूर्ण क्षेत्रात लागवड पूर्ण होईल. यासह नागली वरई पिकाची पाच टक्के लागवड झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर, मंडळ कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी शेतकºयांना भात लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन सुरू केले आहे. चारसूत्री भात लागवड तंत्रज्ञान आण िकृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन शेतकºयांनी उत्पादनात वृद्धी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
इगतपुरी तालुक्यातील परदेशवाडी येथे भात पुर्नलागवडीला सुरु वात झाली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेअंतर्गत चार सूत्री पध्दतीने भात लागवडीचे प्रात्यिक्षक घेण्यात आले. महिनाभर हुलकावणी दिलेला पाऊस समाधानकारक सुरू असल्याने भात लागवडीच्या कामांनी वेग घेतला आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय शेतकºयांसाठी तत्परतेने मार्गदर्शन करीत असून शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा. लाभार्थी शेतकरी त्र्यंबक वाजे म्हणाले की कृषी अधिकार्यांच्या सल्ल्यानुसार भात उत्पादनात वाढ, जमिनीचा पोत सुधारणे, भांडवली खर्चात बचत, पाण्याचा अपव्यय टाळणे आदी फायदे होऊन किफायतशीर शेती करता येणे शक्य आहे. यावेळी लाभार्थी शेतकर्यांसह कृषी सहायक काळे आदी उपस्थित होते.