इगतपुरी तालुक्यात अनेक कुटुंबे घरकुलापासून राहणार वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:10 AM2021-07-04T04:10:53+5:302021-07-04T04:10:53+5:30
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष उमेश खातळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी इगतपुरीचे गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. ही ...
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष उमेश खातळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी इगतपुरीचे गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देऊन अचानक वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करून गरजू लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्याची मागणी केली आहे. याबाबत दखल न घेतल्यास वंचित कुटुंबांच्या नागरिकांसह ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष उमेश खताळे यांच्यासह उपतालुकाध्यक्ष नारायण वळकंडे, वसीम सय्यद, नीलेश जगताप, सागर टोचे, आदी उपस्थित होते.
------------------
ऑनलाइन दाखविले अपात्र
इगतपुरी तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार गरजू कुटुंबांची लाभार्थी निवड करून ग्रामसभेत मंजूर केली जाते. ग्रामसभेच्या मान्यतेने कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीच्या माध्यमातून घरकुलांचा लाभ मिळवून दिला जातो. परंतु प्रशासनाने प्रपत्र ड मध्ये आवास प्लस ॲपमध्ये सर्वेक्षण झालेल्या बहुतांश लाभार्थी घरकुलांसाठी पात्र असूनही ऑनलाइन अपात्र दर्शविले आहे. त्यातून ‘ड’ यादीतून नावे वगळली गेली आहेत. यात कातकरी, विधवा, दिव्यांग, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी व सर्वसाधारण या लाभार्थींचे जॉब कार्ड मॅप होत नाही. त्यामुळे तालुक्यातील जवळपास चार ते पाच हजार गरजू कुटुंबे घरकुलाच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. (०३ घोटी)
030721\03nsk_19_03072021_13.jpg
०३ घोटी