केंद्र शासनाच्या विरोधात इगतपुरी तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:15 AM2021-03-27T04:15:12+5:302021-03-27T04:15:12+5:30
इगतपुरी : देशातील शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून केंद्र शासनाने शेतकरी विरोधातील काळे कायदे लादले असून पेट्रोल, ...
इगतपुरी :
देशातील शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून केंद्र शासनाने शेतकरी विरोधातील काळे कायदे लादले असून पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढत्या किमतींमुळे जनता व शेतकरी यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या धोरणांचा निषेध करण्यासाठी दि. २६ रोजी इगतपुरी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण करून केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या कृषीमालाला योग्य भाव मिळत नसून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचा पीकविमा मिळालेला नाही, तो लवकर मिळावा. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, गॅस आदींच्या वाढत्या किमती कमी कराव्यात, कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले. आमदार हिरामण खोसकर, तालुका अध्यक्ष रामदास धांडे, माजी पंचायत समिती सभापती गोपाळ लहांगे, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी, बाळासाहेब कुकडे, महिला अध्यक्ष मनीषा मालुंजकर, निवृती कातोरे, सुदाम भोर, इगतपुरी शहराध्यक्ष संतोष सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष वसीम सैयद, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे, सत्तार मणियार, सचिव संदीप डावखर, अरुण गायकर, दशरथ पगारे, पंढरीनाथ बऱ्हे, एम. पी. चव्हाण, उल्हास जाधव, तानाजी मते, ज्ञानेश्वर कडू, पांडुरंग शिंदे, गणेश कवटे, कैलास घारे, पंकज माळी आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
( फोटो )
===Photopath===
260321\26nsk_20_26032021_13.jpg
===Caption===
काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र शासनाच्या निषेर्धात तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देतांना आमदार हिरामण खोसकरसह पदाधिकारी व कार्यकर्ते