इगतपुरी तालुक्यात संततधार
By admin | Published: August 5, 2016 10:12 PM2016-08-05T22:12:47+5:302016-08-05T22:13:30+5:30
नुकसान : भात पिकाचे पंचनामे करण्याची मागणी; गाळ काढण्याच्या कामाला वेग
घोटी : इगतपुरी तालुक्यात महिन्याभरापासून सुरू असलेल्या संततधारेने नदीनाल्यान्ाां आलेल्या पुराने भातपिकाचे प्रचंड नुकसान झाले असून, पाण्याच्या प्रवाहात शेतीचे बांधही वाहून गेल्याने हजारो हेक्टर भात पिकाचे नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त भात शेतीचे महसूल विभागाने पंचनामे करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारपर्यंत पावसाने विश्रांती घेतल्यामुळे इगतपुरी तालुक्यात काही काळ सूर्यदर्शन झाले. त्यानंतर मात्र पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
तालुक्यात महिन्याभरापासून कोसळणाऱ्या मुसळधारेने थोडीही उसंत न दिल्याने नदी-नाल्यांना मोठे पूर आले असून, यामुळे भात लागवड करण्यात आलेले हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले असून, लागवड केलेल्या भाताची पिके सडू लागले आहेत. याबरोबर मातीचे बांध ही या पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
(वार्ताहर)