इगतपुरी तालुक्यात दुपारनंतर वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 01:13 AM2019-04-30T01:13:28+5:302019-04-30T01:13:47+5:30
तालुक्यातील मतदान केंद्रांवर सकाळी ११ वाजेपर्यंत मतदानाला अल्प प्रतिसाद मिळाला, मात्र दुपारनंतर वेग आल्याने पाच वाजेपर्यंत ५७ टक्के मतदानाची नोंद झालेली होती. तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान होत असताना वाडीवºहेतील एका मतदाराने विशिष्ट उमेदवाराला मतदान करतानाचे छायाचित्र फेसबुकवर टाकल्याने गोपनीयतेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इगतपुरी : तालुक्यातील मतदान केंद्रांवर सकाळी ११ वाजेपर्यंत मतदानाला अल्प प्रतिसाद मिळाला, मात्र दुपारनंतर वेग आल्याने पाच वाजेपर्यंत ५७ टक्के मतदानाची नोंद झालेली होती. तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान होत असताना वाडीवºहेतील एका मतदाराने विशिष्ट उमेदवाराला मतदान करतानाचे छायाचित्र फेसबुकवर टाकल्याने गोपनीयतेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इगतपुरी तालुक्यात १५६ मतदान केंद्र असून सोमवारी सकाळी सात वाजता प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी ११ वाजेपर्यंत फक्त १४.५० टक्के मतदान झाले होते. मात्र दुपारपासून मतदान केंद्रावर गर्दी दिसू लागली होती. तालुक्यातील दोन मतदान केंद्रावरील यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने तातडीने यंत्र बदलून मतदान सुरू करण्यात आले. दिव्यांग आणि वृद्ध मतदारांना मतदान करता यावे म्हणून प्रत्येक केंद्रावर विशेष व्यवस्था करण्यात आलेली होती.
छायाचित्र काढून फेसबुकवर पोस्ट
मतदान केंद्रात मोबाइल नेण्यास बंदी असताना वाडीवºहे येथील मतदान केंद्रात नितीन कचरू कातोरे हे मोबाइल घेऊन गेले. त्यांनी स्वत:चे मत नोंदवत असतांना छायाचित्र काढून ते फेसबुकवर पोस्ट केले. निवडणूक यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब गोपनीयतेचा भंग असल्याचे सांगून मतदान केंद्र अध्यक्षांना संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची सूचना केली. त्यानुसार वाडीवºहे पोलीसात संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.