इगतपुरी तालुका कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:35+5:302021-06-09T04:16:35+5:30
घोटी : चार जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या इगतपुरी या आदिवासी तालुक्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाचा हाहाकार पहावयास मिळाला. अनेक रुग्ण संक्रमित ...
घोटी : चार जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या इगतपुरी या आदिवासी तालुक्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाचा हाहाकार पहावयास मिळाला. अनेक रुग्ण संक्रमित झाले, तर बहुतांश नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, गेल्या महिनाभरापासून इगतपुरी तालुक्यात दिलासादायक चित्र निर्माण होऊन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात १ जूनअखेर जवळपास ९० गावे कोरोनामुक्त झाली आहे, तर २८ गावांत केवळ ८३ रुग्ण उपचार घेत आहेत.
ग्रामीण भागासह हॉटस्पॉट ठरलेली गावेही कोरोमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिलासादायक आहे. आरोग्य यंत्रणा, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, स्थानिक प्रशासन अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या प्रयत्नांमुळेच हे आश्वासक चित्र दिसून येत आहे. सद्य:स्थितीतही तालुक्यात बहुतेक दिवस एक आकडी रुग्णसंख्य वाढत आहे तर कोरोनामुक्तचे प्रमाण अधिक आहे.
तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर प्रशासन यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य यंत्रणेने विविध उपाययोजना करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. विविध लोकप्रतिनिधी, संघटना व समाजसेवी संस्था यांनीही पुढाकार घेऊन रुग्णांना, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना सर्वतोपरी मदतीचा हात दिला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. लॉकडाऊन करण्यात आले, गर्दी हटविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार, बीडीओ यांच्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी तालुक्यातील विविध भागात भेटी देऊन सूचना केल्या होत्या. नागरिकांनी शासनाने जारी केलेली त्रिसूत्री पाळल्याने तालुका कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे.
-----------------------------------
कोरोनामुक्त गावे :
फांगुळगव्हाण, बोरटेंभे, तळोशी, आवळखेड, चिंचले, भावली खुर्द, गावंडे, मानवेढे, बोरली, जामुंडे, बलायदुरी, पारदेवी, त्रिंगलवाडी, कावनई, माणिकखांब, बितुर्ली, वाकी, खैरगाव टाकेघोटी, शेणवड बु. तळोघ देवळा, पिंपळगाव मोर, दौंडत, भरवज, निरपन, खंबाळे, अडवण, कुरुंगवाडी, अडसरे खुर्द, मायदरा धानोशी, टाकेद खुर्द बांबळेवाडी, घोडेवाडी, शिरेवाडी, आंबेवाडी, मांजरगाव, वासाळी, इंदोरे, खडकेद, रामनगर, परदेशवाडी, काननवाडी, आधारवड, बारशीगावे, सोनोशी, राहुलनगर, धारगाव, नागोसली, ओंडली, कऱ्हाळे,रायांबे, कोरपगाव, पिंपळगाव भटाटा, धारणोली, वाळविहीर, सातुर्ली, आहुर्ली, वांजोळे, शेवंगेडांग, म्हसुर्ली, पिंपळगाव डुकरा, निनावी,साकुर, घोटी खुर्द, भरवीर बु., भंडारदरावाडी, बेलगाव तऱ्हाळे, गंभीरवाडी, धामणी, लहांगेवाडी, मुरंबी, गडगडसंगवी, कुशेगाव, पाडळी,शेणवड खुर्द, मुकणे, मुंढेगाव, गरुडेश्वर, बेलगाव कुर्हे, नांदूरवैद्य, नांदगाव बु. कृष्णनगर, लक्ष्मीनगर, मालुंजे, वाघेरा, सोमज, मोगरा ही गावे कोरोनामुक्त आहे.