इगतपुरी तालुक्याला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:16 AM2021-09-23T04:16:55+5:302021-09-23T04:16:55+5:30
गणेशोत्सवात पावसाने चांगली हजेरी लावल्याने गणेशोत्सवानंतर पाऊस थांबेल अशी शक्यता असताना गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात पुन्हा पावसाने जोर धरल्याने ...
गणेशोत्सवात पावसाने चांगली हजेरी लावल्याने गणेशोत्सवानंतर पाऊस थांबेल अशी शक्यता असताना गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात पुन्हा पावसाने जोर धरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवार दुपारपासून तालुक्यातील पश्चिम भागात जोरदार, तर पूर्ण भागात रिपरिप झाल्याने वातावरणातही पुन्हा बदल दिसून आला.
इगतपुरी तालुक्यात आजपर्यंत ३०५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाने वार्षिक सरासरी गाठल्याने तालुक्यातील सर्वच भागांत समाधानाचे चित्र आहे. तालुक्यात गेल्याच आठवड्यात दारणा, भावली, भाम, कडवा, वैतरणा ही धरणे भरून ओसंडून गेल्याने तालुक्यतील धरणांतून विसर्गही सुरू असल्याने नदीपात्रेही भरून वाहत आहेत.
--------------------------------------
फोटो - २२ वैतरणा डॅम
वैतरणा धरणातून सुरू असलेला विसर्ग.
220921\22nsk_27_22092021_13.jpg
फोटो - २२ वैतरणा डॅम