इगतपुरीत तिघे पॉझिटिव्ह, परिसर केला सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 10:24 PM2020-06-07T22:24:06+5:302020-06-08T00:29:51+5:30
इगतपुरी शहरात कोरोनाचा आलेख वाढतच असून रविवार (दि. ७) रोजी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण संख्येत भर पडली आहे.
इगतपुरी : शहरात कोरोनाचा आलेख वाढतच असून रविवार (दि. ७) रोजी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण संख्येत भर पडली आहे.
शहरातील नवाबाजार येथील ५६ वर्षीय व्यक्ती दि. ६ रोजी कोरोना बाधित आढळून येताच त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून त्याच्या कुटुंबातील चार जणांना क्वॉरण्टाइन करण्यात आले होते. त्यांची तपासणी केल्यावर त्यातील तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात २१ वर्ष मुलगा , २५ वर्षीय इसम तसेच ४६ वर्षीय एका महिलेचा समावेश आहे. त्यामुळे आता रुग्णांचा ४ वर गेला आहे. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा प्रशासनाकडून शोध घेतला आहे. तहसीलदार परमेश्वर कासुळे, मुख्याधिकारी निर्मला गायकवाड-पेखळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. बी. देशमुख, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वरूपा देवरे, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी नवाबाजार परिसरात असलेल्या या भागाला सील केले आहे.