इगतपुरी ट्रामा केअर उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:58 AM2018-07-29T00:58:15+5:302018-07-29T00:58:34+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयाशेजारी असलेले ट्रामा केअर सेंटर अनेक दिवसांपासून बांधून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. बंद अवस्थेतील हे ट्रामा केअर शोभेची वास्तू आहे का, असा प्रश्न नगरसेवक दिनेश कोळेकर यांनी उपस्थित केला आहे.
इगतपुरी : येथील ग्रामीण रुग्णालयाशेजारी असलेले ट्रामा केअर सेंटर अनेक दिवसांपासून बांधून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. बंद अवस्थेतील हे ट्रामा केअर शोभेची वास्तू आहे का, असा प्रश्न नगरसेवक दिनेश कोळेकर यांनी उपस्थित केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून बांधलेले ट्रामा केअर सेंटर अद्याप अपुऱ्या कामांमुळे व अपुºया डॉक्टर, कर्मचाºयांमुळे बंद अवस्थेत पडून आहे. याचा रुग्णांना कोणताही उपयोग होत नाही. ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनात आणून दिल्याने खडबडून जागे झालेल्या अधिकाºयांनी तत्काळ नगरसेवक दिनेश कोळेकरांसोबत ट्रामा केअरची पाहणी केली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.पवार, गोसावी यांनी येथील कामांबाबत माहिती दिली. प्रशासनाने येथे वैद्यकीय अधिकाºयांसह यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी आणि ट्रामा केअर सेंटर लोकसेवेत रुजू करावे, अशी मागणी कोळेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. राष्ट्रीय महामार्गावर लहान-मोठ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. घाटात होणारे अपघातांचे प्रमाण वाढले असून, जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागते.
इमारत परिसर बनला जुगार अड्डा
तीन वर्षांपूर्वी बांधलेले ट्रामा केअर सेंटरची इमारत धूळ खात आहे. सदर परिसर मद्यपी व जुगारांचा अड्डा झाला आहे. या इमारतीचे रंगरंगोटीसह सर्व कामे पूर्ण झाली असून, पाण्याची व विजेची सोय न झाल्यामुळे ही इमारत वापरात नाही. याकरिता ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर व व्यवस्थापन विभागाने वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केला. मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनात आले आहे.