इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या काँग्रेस आमदार निर्मला गावित शिवसेनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 01:27 PM2019-08-21T13:27:43+5:302019-08-21T13:28:51+5:30

घोटी : इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघात सलग दोनवेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसच्या विद्यमान आमदार निर्मला गावित यांनी बुधवारी (दि. २१) शिवसेनेत प्रवेश केला.

Igatpuri Trimbakeshwar's Congress MLA Nirmala Gavit in Shiv Sena | इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या काँग्रेस आमदार निर्मला गावित शिवसेनेत

इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या काँग्रेस आमदार निर्मला गावित शिवसेनेत

Next

घोटी : इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघात सलग दोनवेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसच्या विद्यमान आमदार निर्मला गावित यांनी बुधवारी (दि. २१) शिवसेनेत प्रवेश केला. दोन्ही तालुक्यातील बहुतांशी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह गावित यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधले. यावेळी या प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी कार्यकर्त्यांनी मुंबईत शक्तिप्रदर्शन केले. निर्मला गावित या गांधी कुटुंबाशी अनेक वर्षांपासून निष्ठावान असणारे माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. गेल्या काही दिवसापासून त्यांच्या पक्षांतराबाबत झडत असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असला तरी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलली आहेत. आमदारकीची तिसºयांदा हॅट्रिक करण्यासाठी सरसावलेल्या गावित यांनी कार्यकर्त्यांचा सततचा आग्रह, मतदारसंघातील संथ विकासाला गतिमानता आणण्यासाठी सेनाप्रवेश केल्याचे म्हटले आहे. इंदिरा काँग्रेस पक्षावर कोणतीही नाराजी नसून मतदारसंघाच्या शाश्वत हितासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी आमदार निर्मला गावित यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी गावित यांच्यासह दोन्ही तालुक्यातील शेकडो पदाधिकाºयांनी सेनेत प्रवेश केला. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, तालुकाप्रमुख भगवान आडोळे, पंचायत समिती गटनेते विठ्ठल लंगडे, समाधान बोडके, त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख रवी वारु ंगसे, संपत चव्हाण, समाधान आहेर, नितीन लाखन, मिथुन राऊत, निवृत्ती लांबे, मनोहर मेढे, समाधान जाधव, संजय जाधव उपस्थित होते.

Web Title: Igatpuri Trimbakeshwar's Congress MLA Nirmala Gavit in Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक