इगतपुरी, त्र्यंबकला पावसाचा जोर कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 01:05 AM2019-07-12T01:05:24+5:302019-07-12T01:06:26+5:30
गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक तर काही भागात जोरदार पाऊस होत असून, जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ होत आहे. त्र्यंबक आणि इगतपुरी या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक असून, गुरुवारीदेखील या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली.
नाशिक : गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक तर काही भागात जोरदार पाऊस होत असून, जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ होत आहे. त्र्यंबक आणि इगतपुरी या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक असून, गुरुवारीदेखील या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली. गेल्या २४ तासांत इगतपुरीत १७२ तर त्र्यंबकेश्वरमध्ये १२७ मि.मी. पाऊस कोसळला. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये मात्र तुरळक सरी बसरल्या. नाशिक तालुक्यात ११ तर येवल्यामध्ये २२ मि.मी. पाऊस झाला. गेल्या आठ दिवसांत इगतपुरी, त्र्यंबकप्रमाणे पेठ तालुक्यात होणाऱ्या पावसाने मात्र गुरुवारी काहीशी विश्रांती घेतली. तालुक्यात केवळ ६.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. चांदवड, देवळा, नांदगाव, मालेगाव, बागलाण आणि कळवण हे तालुके कोरडेच राहिले.