इगतपुरीकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:15 AM2021-07-30T04:15:25+5:302021-07-30T04:15:25+5:30
दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची नेहमीच टंचाई भासत असते. नगर परिषदेचा तलाव छोटा असल्याने वर्षभर एक दिवसाआड पाणीपुरवठा होऊ शकत ...
दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची नेहमीच टंचाई भासत असते. नगर परिषदेचा तलाव छोटा असल्याने वर्षभर एक दिवसाआड पाणीपुरवठा होऊ शकत नसल्याने तळेगाव येथील जीवन प्राधिकरण योजनेच्या डॅममधून पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत असते. यंदा मात्र भावली धरणातून थेट पाइप लाइनने पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून काही तांत्रिक मंजुरी व पावसाची अडचण येत असल्याने सद्य:स्थितीत काम बंद ठेवले आहे. लवकरच चोवीस तास पाणीपुरवठा योजना सुरू होणार आहे.
गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे शहरात काही भागांत पाणी साचले होते. रात्रीची वेळ अन् त्यातच वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर पाणी तुंबल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या जागेतून वाहणाऱ्या मोठ्या नाल्यावरच संरक्षक भिंत बांधल्याने पावसाचे पाणी तुंबल्याचे लक्षात येताच रेल्वे प्रशासनाच्या परवानगीने रात्री २ वाजता आरोग्य विभागाचे निरीक्षक यशवंत ताठे व त्यांच्या पथकाने भिंत तोडून पाण्याचा निचरा केल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यात आपत्ती व्यवस्थापनाच्या काही सदस्यांनी देखील मोलाचे सहकार्य केले.
कोट....
इगतपुरी नगर परिषदेच्या मालकीचा तलाव आठच दिवसांत तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे शहरवासीयांसाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. नागरिकांनी पाण्याची नासाडी करू नये, पाणी वाया जाऊ देऊ नये, पावसात भिजू नये, आरोग्याची काळजी घ्यावी. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ याचे पालन करावे.
- पंकज गोसावी, मुख्याधिकारी.
फोटो- २९ इगतपुरी तलाव
इगतपुरी नगर परिषदेचा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाची पाहणी करताना मुख्याधिकारी पंकज गोसावी.
290721\29nsk_35_29072021_13.jpg
फोटो- २९ इगतपुरी तलाव इगतपुरी नगरपरिषदेचा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाची पाहणी करतांना मुख्याधिकारी पंकज गोसावी.