ओतूर आरोग्य केंद्राच्या कारभाराकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:15 AM2018-03-12T00:15:33+5:302018-03-12T00:15:33+5:30
कळवण : येथील पंचायत समितीच्या मासिक बैठकीत ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांसह कर्मचाºयांच्या मनमानी कारभाराविषयी चर्चा होऊन कार्यवाही होणे अपेक्षित होते. मात्र पदाधिकाºयांसह प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभाराला मूक संमती दर्शवली असल्याचे दिसून येत आहे.
कळवण : येथील पंचायत समितीच्या मासिक बैठकीत ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांसह कर्मचाºयांच्या मनमानी कारभाराविषयी चर्चा होऊन कार्यवाही होणे अपेक्षित होते. मात्र पदाधिकाºयांसह प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभाराला मूक संमती दर्शवली असल्याचे दिसून येत आहे.
ओतूर परिसरातील २० ते २२ खेड्यापाड्यातील आदिवासी व सर्वसामान्य जनतेसाठी सुरु असलेले ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र शोभेचे बाहुले बनल्याचा अनुभव गटविकासाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी घेतल्यानंतर पंचायत समितीच्या झालेल्या मासिक बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात येऊन कारवाईचे संकेत दिले गेले होते. मात्र या विषयावर बघ्याची भूमिका घेणे पसंत करु न वैद्यकीय अधिकाºयांसह कर्मचाºयांना पाठिशी घातले गेले.
पंचायत समितीच्या बैठकीत ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभारावर चर्चा होणे अपेक्षित असताना दुर्लक्ष केले गेल्याने ओतूर परिसरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. या परिसरातील आरोग्य सेवेचा प्रश्न आता उभा राहिला असल्याने या प्रकरणी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेऊन उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती ओतूरचे माजी सरपंच रवींद्र सोनवणे यांनी दिली.
वैद्यकीय अधिकाºयांसह कर्मचाºयांच्या समर्थनासाठी ओतूर येथील उत्साही कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी मोहीम सुरु केली असून, एका कर्मचाºयाचा नातेवाईक व एक पदाधिकारी यात आघाडीवर असून मनमानी कारभाराला संरक्षण दिले जात आहे. शिपायांच्या भरवशावर कारभारगटविकासाधिकारी बहिरम व तालुका आरोग्य अधिकारी डॉ पाटील यांनी ओतूर येथे पाहाणी केली होती. त्यावेळी काही कर्मचारी रजेचा अर्ज न देता गैरहजर आढळून आले होते, तर काही कर्मचारी हजेरी पत्रकावर सही करु न गैरहजर आढळून आले होते. शिवाय येथील कर्मचारी वर्गात अंतर्गत राजकारण असल्याने त्यानिमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार चव्हाट्यावर आला असून, शिपायांच्या भरवशावर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभार सुरु असल्याचे यापूर्वी उघड झाले आहे.