सफाई कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 04:50 PM2019-01-04T16:50:13+5:302019-01-04T16:50:18+5:30

पिंपळगाव बसवंत : येथील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पिंपळगाव ग्रामपंचायतीने सकारात्मक निर्णय घेऊन कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सफाई कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष राजा गांगुर्डे यांनी ग्रामपंचयतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 Ignore the demands of the cleaning workers | सफाई कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

सफाई कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

Next
ठळक मुद्दे सफाई कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. सफाई कामगारांना किमान वेतन मिळावे, कामगारांचा पीएफ कपात करण्यात यावा, सेवाज्येष्ठतेनुसार कामगारांना कायम करण्यात यावे,


पिंपळगाव बसवंत : येथील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पिंपळगाव ग्रामपंचायतीने सकारात्मक निर्णय घेऊन कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सफाई कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष राजा गांगुर्डे यांनी ग्रामपंचयतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सफाई कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. सफाई कामगारांना किमान वेतन मिळावे, कामगारांचा पीएफ कपात करण्यात यावा, सेवाज्येष्ठतेनुसार कामगारांना कायम करण्यात यावे, कामाचे सलग आठ तास करण्यात यावे, सार्वजनिक सुट्या नियमाप्रमाणे मिळाव्यात, हॅणडग्लोज, मास्क व इतर साहित्य मिळावे, दर सहा महिन्यांनी कामगार कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी करण्यात यावी व मोफत औषधोपचाराची सुविधा मिळावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीने निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी सफाई कामगार युनियनच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी संतोष गांगुर्डे, पोपट गांगुर्डे, योगेश गायकवाड, रमेश अहिरे, रेखा गांगुर्डे, रमाबाई बागुल, राहुल गांगुर्डे आदी उपस्थित होते.

Web Title:  Ignore the demands of the cleaning workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.