मास्क वापराकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:16 AM2021-05-27T04:16:20+5:302021-05-27T04:16:20+5:30
नाशिक : शहरातील दुकाने बंद असली तरी अनेक ठिकाणी मागच्या बाजूने व्यवसाय सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे दुकाने ...
नाशिक : शहरातील दुकाने बंद असली तरी अनेक ठिकाणी मागच्या बाजूने व्यवसाय सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे दुकाने बंद ठेवण्याचा उद्देश सफल होत नाही. याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
झाडांची छाटणी करण्याची मागणी
नाशिक : शहरातील अनेक सोसायटी आणि रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांवर लोंबकळत असल्याने पावसाळ्यात ते धोकादायक ठरू शकते. वीज वितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
खरीप हंगामाची तयारी
नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून, मशागतीची कामे उरकली जात आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीस सुरुवात केली आहे. यावर्षी दरवाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
भाजीपाल्याचे दर घसरले
नाशिक : आवक वाढल्याने भाजीपाल्याच्या दरांमध्ये घसरण झाली असल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे बाजार समित्या बंद असल्यामुळे भाजीपाल्याची आवक बंद झाली होती. किरकाेळ विक्रेत्यांना माल मिळणे मुश्कील झाले होते. आता व्यवहार सुरळीत होऊ लागले असले तरी किरकोळ विक्रेत्यांना अद्याप बाजार समितीत बंदी आहे.
रुग्णसंख्या कमी पण धोका कायम
नाशिक : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी अद्याप धोका टळलेला नाही. यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे. घराबाहेर पडताना मास्कचा वापर, वेळोवेळी सॅनिटायझेसनचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
पथदीपांची दुरुस्ती करण्याची मागणी
नाशिक : शहरातील अनेक भागांत पथदीप बंद असल्याने रात्रीच्या वेळी या परिसरात अंधार पसरतो. यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. अनेक ठिकाणी रस्त्यावर वर्दळ असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पथदीपांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.
गॅरेज कारागिरांना आर्थिक अडचण
नाशिक : लॉकडाऊनमुळे मागील महिनाभरापासून व्यावसाय बंद असल्याने अनेक गॅरेज कारागिरांना रोजगार मिळणे मुश्कील झाले आहे. यामुळे त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. अनेकांना बँकांचे हप्तेही भरता येत नसून, वित्त संस्थांनी त्यांच्यामागे तगादा लावला आहे.