कोरोना नियमांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:12 AM2021-05-29T04:12:32+5:302021-05-29T04:12:32+5:30
शेतकऱ्यांनी थाटली भाजीपाल्यांची दुकाने नाशिक : ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांनी स्वत:च भाजीपाला, फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. अनेक मार्गांवर ...
शेतकऱ्यांनी थाटली भाजीपाल्यांची दुकाने
नाशिक : ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांनी स्वत:च भाजीपाला, फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. अनेक मार्गांवर शेतकऱ्यांनी दुकाने थाटली आहेत. थेट शेतकऱ्यांकडून स्वस्त आणि ताजा भाजीपाला मिळत असल्याने रस्त्याने जाणारे अनेक नागरिक वाहने थांबवून येथून भाजीपाला खरेदी करतात. यामुळे शेतकऱ्यांनाही दोन पैसे मिळत असून त्यांचा मालविक्रीचा खर्चही कमी होऊ लागला आहे.
भाविकांची संख्या कमी झाल्याने अडचणी
नाशिक : गंगेवर धार्मिक विधीसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाल्याने या परिसरात विविध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत. यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेकांना बँकांचे कर्जही फेडता येत नसल्याने वित्तसंस्थांचा त्यांच्यामागे तगादा वाढला आहे
पावसाळापूर्वी कामे करण्याची मागणी
नाशिक : पावसाळा तोंडावर आला असला तरी महापालिकेकडून अद्याप पावसाळी गटारींची कामे पूर्ण झाली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचते. काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरत असल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मनपाने पावसाळी गटारींची कामे त्वरित पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.