झोपडपट्ट्यांमध्ये डिस्टन्स नियमांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:13 AM2021-03-20T04:13:58+5:302021-03-20T04:13:58+5:30
............. टाकळी लिंक रस्त्यावर दुभाजक नाशिक : टाकळी जेल रोड लिंक रस्त्यावर टाकळी चौकात दुभाजक बसविण्यात आल्याने वाहतूक सुरक्षित ...
.............
टाकळी लिंक रस्त्यावर दुभाजक
नाशिक : टाकळी जेल रोड लिंक रस्त्यावर टाकळी चौकात दुभाजक बसविण्यात आल्याने वाहतूक सुरक्षित झाली आहे. याापूर्वी दुभाजक नसल्याने चौकातील रस्त्यावर वाहने समोरासमोर येऊन अपघात घडत होते. आता दुभाजकामुळे वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.
म्हसरूळ महापालिका शाळेत लसीकरण
नाशिक: म्हसरूळ येथील महापालिका शाळेमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे आयेाजन करण्यात आले आहे. माजी नगरसेवक अरुण पवार यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. परिरसरातील ज्येष्ठ नागरिकांनी आपले आधारकार्ड घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
......................
वीज बिल भरण्यासाठी रिक्षातून प्रचार
नाशिक : ग्राहकांनी आपले थकीत वीज बिल भरावे असे आवाहन करणारे वाहन परिसरात फिरविले जात आहे. मार्चअखेर वसुलीचे उद्दिष्ट असल्याने जास्तीत जास्त वीज बिल वसुलीसाठी ग्राहकांना प्रवृत्त करण्यासाठी महावितरणने वाहनातून प्रचार-प्रसार सुरू केला आहे. कॉलनी, सोसायटी परिसरांतून ग्राहकांना वीज बिल भरण्याचे आवाहन केले जात आहे.
ग्राहकांकडून कागदी ग्लासची मागणी
नाशिक : ऊन्हाळ्यामुळे रस्तोरस्ती उसाचा रस तसेच लस्सी, मठ्ठ्याची दुकाने थाटली आहेत. ग्राहकांकडूनदेखील या मागणी वाढली असली तरी ग्राहक कागदी ग्लासाची मागणी करीत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे ग्राहकांकडून खबरदारी म्हणून काचेच्या ग्लासातील सरबत, लस्सी, रसाला नकार दिला जात आहे.
परीक्षांबाबत सोशल मीडियावर अफवा
नाशिक : दहावी, बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेले आहे. काही बदल असेल तर त्याची माहितीदेखील संकेतस्थळावरच दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरील इतर कोणत्याही वृत्तावर विश्वास ठेवू नये, अभ्यास व्यवस्थित करावा, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.